
नाशिक/घोटी : पावसाने उघडीप देताच इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यांत भात कापणीला वेग आला. मात्र सगळीकडे मजुरांची टंचाई असल्याने मजुरीचे दर पाचशे रुपयांपर्यत वाढले आहेत. वाढीव दर देउनही मजूर मिळत नसल्याने गावोगावच्या ग्रामपंचायत सदस्यांवर कुटुंबासह शेतात काम करावे लागत आहे.
वाड्या-वस्त्यांवर जाउन विनवणी
इगतपुरीत २८ हजार ४०० तर, त्र्यंबकेश्वर १५ हजार ६०० हेक्टरवर भात लागवड झाली असून पिके काढणी दरम्यान अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झाले. शेतात साठलेल्या पाण्यात मजुर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना मिळेल त्या भावात मजुर मिळवावे लागत आहे. दिवसा ऑक्टोबर हिट आणि शेतात साचलेले पाणी सोबत बोचऱ्या थंडीत काम कारतांना मजूरांनी भाव वाढविले आहे. त्याचा फटका मजुरांच्या टंचाईवर झाला आहे. गावोगाव फिरुन मिळेल तिथून मजुरांचे तांडे शोधण्यासाठी रात्र-अपरात्री गावोगावी वाड्या-वस्त्यांवर जाउन विनवणीची वेळ आली आहे.
गावोगावच्या कारभाऱ्यांचा शेतात तळ
पाण्यातील भात कापणी ५०० रुपये तर बिगर पाण्यातील ३५० रुपये मजुरी द्यावी लागते. मजुरी आणि भात-बियाणे व रासायनिक खतांच्या किंमती पाहिल्यास शेतकऱ्यांच्या पदरात शिल्लकच काही पडत नाही. अवकाळी पावसाने पिके गेली अन, मजुरीने त्यात भर पडली आहे. विमा कंपन्यांकडून प्रधानमंत्री पिक विमा योजनेपासून अपात्र ठरविण्याचे प्रकार वाढत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मजुरांच्या टंचाईने हैराण झालेले घोटी ग्रामपालिका माजी सरपंच शाम घोटकर व विद्यामान सदस्या पत्नी सुनंदा घोटकर हे सद्या गेल्या काही दिवसांपासून शेतावर तळ ठोकून स्वताच भात कापणी, झोडणी, भात उपणने आदि कामे मजुरांच्या भरवशावर न राहता, स्वताच विविध कामे करत आहे. घोटकर हे गावोगावच्या मजुर टंचाईचे प्रातिनिधीक उदाहरण आहे. हीच परिस्थिती गावोगावच्या कारभाऱ्यावर आली आहे.
अवकाळी पावसाने होत्याचे नव्हते केले, पिके वेळेत नाही काढली तर नुकसान होणार आहे. मजुरीचे दर प्रचंड वाढल्याने शेती परवडत नाही. त्यात मजूर मिळत नाही. त्यामुळे कुटुंब कबिल्यासह शेतावर काम करत आहे.
– शाम घोटकर, माजी सरपंच घोटी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.