जिल्ह्यातून 'फाइव्ह स्टार व्हिलेज'साठी 'या' गावांची निवड; काय मिळणार सुविधा? वाचा सविस्तर

मोठाभाऊ पगार
Saturday, 29 August 2020

पोस्टाच्या बॅंकिंग सुविधा मिळण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या फाइव्ह स्टार व्हिलेज पायलट कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातून पाच गावांची निवड झाली आहे. त्यात पायलट प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र राज्याची व या राज्यातून केवळ दहा जिल्ह्यांची निवड झाली आहे.

नाशिक : (देवळा) पोस्टाच्या बॅंकिंग सुविधा मिळण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या फाइव्ह स्टार व्हिलेज पायलट कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यातून पाच गावांची निवड झाली आहे. त्यात पायलट प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र राज्याची व या राज्यातून केवळ दहा जिल्ह्यांची निवड झाली आहे.

गावांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला जाणार

ग्रामीण भागातील जनतेला पोस्टाच्या माध्यमातून जास्तीत जास्त बँकिंग सुविधा मिळाव्यात, तसेच पोस्टाच्या ग्राहकांना आर्थिक लाभाच्या विविध योजनांचा थेट फायदा मिळावा, या हेतूने फाइव्ह स्टार व्हिलेज कार्यक्रम संपूर्ण देशात राबविण्याचे नियोजन आहे. त्यात पायलट प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र राज्याची व या राज्यातून केवळ दहा जिल्ह्यांची निवड झाली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील वरील पाच गावे या पायलट प्रोजेक्टसाठी निवडली आहेत. विशेष म्हणजे ही सर्व गावे मालेगाव विभागातील आहेत. पुढील महिन्यात माहिती दूरसंचार व दळणवळण मंत्रालयामार्फत या निवड झालेल्या गावांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून थेट संवाद साधला जाणार आहे. 

या गावांचा समावेश

जिल्ह्यातील खुंटेवाडी (ता. देवळा), मोकभणगी (ता. कळवण), पळासदरे (ता. मालेगाव), कानमंडाळे व रायपूर (ता. चांदवड) या गावांचा समावेश आहे. इंडियन पोस्टल पेमेंट्स बँक या पोस्टाच्या उपक्रमांतर्गत या गावांनी उल्लेखनीय काम केले आहे. येथे सुकन्या, बचत अशा खातेधारकांची संख्या मोठी आहे. कॅशलेस व्यवहार येथे होऊ लागले आहेत. यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यातून ५० गावे घेणार आहेत. नंतरच्या टप्प्यात सर्वच गावांमध्ये या सुविधा पोस्टात उपलब्ध होणार आहेत. 

५ Star Village:*संकल्पना 
पोस्टाच्या खालील प्रकारातील योजना गावातील प्रत्येक घरात पोचविणे : 

१. सेव्हिंग बँकेच्या योजना, 
२. सुकन्या समृद्धी योजना, 
३. आयपीपीबी खाते, 
४. टपाल जीवनविमा, 
५. प्रधानमंत्री जीवनज्योती व जीवन सुरक्षा योजना. 

 हेही वाचा > वाद सोडवणे बेतले दोघा भावांंच्या जीवावर! पोलीस कॉन्स्टेबल ठरणार घटनेचे महत्वपूर्ण साक्षीदार; काय घडले नेमके?

जनधन खाते, गॅस सबसिडी, शिष्यवृत्ती असे आर्थिक लाभ थेट प्रत्येक कुटुंबाला, नागरिकाला, विद्यार्थ्यांना मिळावेत, तसेच पोस्टाच्या माध्यमातून कॅशलेस व्यवहार व्हावेत, आर्थिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी फाइव्ह स्टार व्हिलेज कार्यक्रम प्रायोगिक तत्त्वावर या पाच गावांमध्ये राबविला जात आहे. - एम. एस. अहिरराव, वरिष्ठ डाक अधीक्षक, नाशिक/मालेगाव 

हेही वाचा > घरभाड्याची मागणी करताच भाडेकरूने घरमालकासोबत केला "धक्कादायक" प्रकार! परिसरात खळबळ; काय घडले वाचा

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: These villages have been selected for 'Five Star Village' from Nashik district nashik marathi news