चोरांमध्येही ब्रॅंडची क्रेझ! विदेशी दारुवर डल्ला; देशी दारूला मात्र लावला नाही हात

प्रमोद सावंत  
Tuesday, 13 October 2020

दुकानाचे शटर उचकटलेले आढळल्याने विशालने मंडाळे यांना माहिती दिली. चोरट्यांनी दुकानातून विविध विदेशी ब्रॅन्डच्या बाटल्या लंपास केल्या. पण एकही देशी दारूची बाटली चोरली नाही. असा चोरट्यांचा अजब कारनामा उघडकीस आला आहे.

नाशिक / मालेगाव : दुकानाचे शटर उचकटलेले आढळल्याने विशालने मंडाळे यांना माहिती दिली. चोरट्यांनी दुकानातून विविध विदेशी ब्रॅन्डच्या बाटल्या लंपास केल्या. पण एकही देशी दारूची बाटली चोरली नाही. असा चोरट्यांचा अजब कारनामा उघडकीस आला आहे. 

चोरटेही ब्रॅंडच्या प्रेमात! अजब कारनामा

भरचौकात झालेल्या घटनेमुळे सटाणा नाका भागात खळबळ उडाली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर सोमवारी पहाटेच्या दरम्यान हा प्रकार घडला. 
शहरातील सटाणा नाका भागातील मध्यवर्ती चौकात असलेले फुलाजी वाइन शॉपचे व्यवस्थापक राजेंद्र मंडाळे यांच्या तक्रारीवरून छावणी पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी सकाळी वाइन शॉपनजीक असलेल्या चहाटपरीवरील विशाल नामक तरुणाच्या लक्षात हा घरफोडीचा प्रकार आला. दुकानाचे शटर उचकटलेले आढळल्याने विशालने मंडाळे यांना ही माहिती दिली. चोरट्यांनी दुकानातून विविध ब्रॅन्डच्या १८० ते ७५० मिलीच्या बाटल्या लंपास केल्या. चोरीत विशेष बाब म्हणजे या चोरट्यांनी एकही देशी दारूची बाटली चोरली नाही.  फुलाजी वाइन शॉप या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी एक लाख ८५ हजार ६०० रुपये किमतीच्या ७६५ विदेशी दारूच्या बाटल्या चोरून नेल्या.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves attack foreign liquor nashik marathi news