राजेंद्र सरदार खून प्रकरण : प्रियकर- प्रेयसीला खूनासाठी मदत करणारा 'तो' अखेर पोलीसांच्या जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

सटाणा शहरापासून जवळच असलेल्या कोळीपाडा रस्त्यावर राजेंद्र सरदार यांचा निर्घुण खून करून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री दोधेश्वर (ता.बागलाण) येथील घाट रस्त्यावर त्यांचा अपघात झाल्याचा बनाव मारेकर्‍यांनी केला होता. सरदार यांचा खुन झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आतच सटाणा पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी हर्षदा सोनवणे व रवि खलाले या प्रेमी युगुलाला मोबाईल ट्रॅकिंगच्या आधारे अटक केली होती. पण त्यानंतर...

नाशिक / सटाणा : सटाणा शहरापासून जवळच असलेल्या कोळीपाडा रस्त्यावर राजेंद्र सरदार यांचा निर्घुण खून करून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री दोधेश्वर (ता.बागलाण) येथील घाट रस्त्यावर त्यांचा अपघात झाल्याचा बनाव मारेकर्‍यांनी केला होता. सरदार यांचा खुन झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आतच सटाणा पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी हर्षदा सोनवणे व रवि खलाले या प्रेमी युगुलाला मोबाईल ट्रॅकिंगच्या आधारे अटक केली होती. दोन्ही आरोपींना २० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. पण अखेर या प्रकरणातील तिसऱ्या संशयितालाही अटक करण्यात आली आहे.

अशी घडली घटना

सटाणा शहरापासून जवळच असलेल्या कोळीपाडा रस्त्यावर राजेंद्र सरदार यांचा निर्घुण खून करून प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री दोधेश्वर (ता.बागलाण) येथील घाट रस्त्यावर त्यांचा अपघात झाल्याचा बनाव मारेकर्‍यांनी केला होता. सरदार यांचा खुन झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आतच सटाणा पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी हर्षदा सोनवणे व रवि खलाले या प्रेमी युगुलाला मोबाईल ट्रॅकिंगच्या आधारे अटक केली होती. दोन्ही आरोपींना २० मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यानच्या काळात सटाणा पोलिसांनी या दोघा संशयितांकडून चौकशी केली असून खून प्रकरणात आरोपींना कोणी मदत केली, याविषयी काही माहिती मिळाल्याचे पोलिस सूत्रांकडून समजते. त्यामुळे पोलिसांनी शहरातील सिध्दार्थ नगर मधून आशुतोष बच्छाव याला अटक करून ताब्यात घेतले. आता या गुन्ह्यातील संशयित आरोपींची संख्या ३ झाली आहे. या खूनाचा तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र शिंदे, किरण पाटिल, पोलिस उपनिरीक्षक राहुल गवई करीत आहेत

तिघा संशयिताना २२ मे पर्यंत पोलिस कोठडी

गुरुवार (ता.१४) रोजी येथील सटाणा ग्राहक संघाचे माजी सभापती आणि सम्राट म्युझिकल्सचे संचालक (कै.) राजेंद्र सरदार यांच्या झालेल्या निर्घुण खूनप्रकरणी सटाणा पोलिसांनी शहरातील आशुतोष विलास बच्छाव या तिसर्‍या संशयित आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात आशुतोषचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला शिताफीने अटक केली. दरम्यान, यापूर्वी अटक झालेल्या हर्षदा सोनवणे आणि रवि खलाले यांच्यासह आशुतोष बच्छाव यास आज बुधवार (ता.२०) रोजी सटाणा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायाधीश विक्रम आव्हाड यांनी तिघांना शुक्रवार (ता.२२ मे) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा > पत्रकारावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोर सरपंचावर कोरोनाची मेहेरबानी...की आणखी काही? संशय कायम
.

खून प्रकरणात राजकीय सहभागाचा सरदार कुटुंबियांचा आरोप...
सटाणा ग्राहक संघाचे माजी सभापती आणि सम्राट म्युझिकल्सचे संचालक (कै.) राजेंद्र सरदार यांच्या खून प्रकरणात रवी खलाले व हर्षदा सोनवणे यांच्यासोबत आशुतोष बच्छाव, अरुण सोनवणे आणि शहरातील इतर राजकीय नेत्यांचा थेट सहभाग असून पूर्ववैमनस्यातून (कै.) सरदार यांचा खून झाल्याचा आरोप सरदार यांच्या कुटुंबियांनी केला आहे. (कै.) सरदार यांचे बंधु ईश्वर सरदार यांनी पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले आहे. निवेदनात, घटनेच्या आदल्या दिवशी हे सर्व संशयित आणि काही राजकीय नेते (कै.) सरदार यांच्यावर पाळत ठेऊन असल्याचे गावातील काही नागरिकांनी बघितले आहे. मृतदेहाची अवस्था बघता हा खून अतिशय क्रूरपणे, पूर्वनियोजित आणि संघटितरित्या केल्याचे दिसून येत आहे. पूर्ववैमनस्यातूनच सरदार यांचा खून झाला आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा द्यावी आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही सरदार कुटुंबियांनी निवेदनात केली आहे.

हेही वाचा > दिलासादायक! नाशिक शहरात कोरोनाला लागतोय "ब्रेक'...ही आहेत कारणे.. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Third suspect arrested in Sardar murder case nashik crime marathi news