बच्चू कडू यांना जीवे मारण्याची धमकी; प्रहारच्या जिल्हाध्यक्षासही लुटले! काय घडले वाचा

विनोद बेदरकर
Friday, 18 September 2020

सहकाऱ्यांना शिवीगाळ करीत कडू यांना मारेलच.. परंतू तूलाही जीवे मारेल अशी धमकी देत भडांगे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी बळजबरी काढून घेतल्याची अनिल भडांगे यांनी सांगितले.

नाशिक : संशयिताने सहकाऱ्यांना शिवीगाळ करीत "कडू यांना मारेलच.. परंतू तूलाही जीवे मारेल" अशी धमकी दिली. आणि गळ्यातील सोनसाखळी बळजबरी काढून घेतल्याचे प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे यांनी सांगितले. तसेच...

बच्चू कडू यांना जीवे मारण्याची धमकी; प्रहारच्या जिल्हाध्यक्षास लुटले 

प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे (रा.क्रांतीनगर,मखमलाबाद रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. भडांगे व त्यांचे सहकारी वैभव देशमुख आणि जगन काकडे बुधवारी (ता.१६) रात्री क्रांतीनगर कडून भावबंधन लॉन्स कडे जाणाऱ्या रस्त्यावरील हनुमानवाडीच्या कोपऱ्यावर तिघे जण गप्पा मारत असतांना कारमधून आलेल्या शरद पवार नावाच्या एका अभियंत्यासह त्याच्या सात आठ साथीदारांनी कुठलेही कारण नसतांना संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवीगाळ केली. भडांगे यांनी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी त्यांना व त्यांच्या समवेत असलेल्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करीत कडू यांना मारेलच परंतू तूलाही जीवे मारेल अशी धमकी देत भडांगे यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी बळजबरी काढून घेतल्याची अनिल भडांगे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास निरीक्षक अशोक साखरे करीत आहेत. 

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

जबरी लुटीचा गुन्हा दाखल

कारमधून आलेल्या टोळक्याने चाकूचा धाक दाखवत व मारहाण करीत प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्षास लुटल्याची घटना हनुमानवाडी भागात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयितांनी राज्य शिक्षण व कामगार मंत्री बच्चू कडू यांनाही जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद पंचवटी पोलिसात दाखल आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threatening to kill Bachhu Kadu nashik marathi news