अखेर तिघे मित्र गेले दीर्घ प्रवासावर! 'लाँग ड्राइव्ह विथ ब्रदर' व्हॉट्सअ‍ॅप स्टेट्स ठरला शेवटचा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 9 October 2020

रात्रीची वेळ...तीन मित्रांचा एका नातेवाइकाकडून परततांनाचा स्कुटीवरील ट्रिपल सीट प्रवास. स्माईल करत फोटो काढून व्हॉट्सअपवर 'लाँग ड्राइव्ह विथ ब्रदर' स्टेट्सही टाकला. पण ते हास्य अन् तो फोटो ही अखेरचाच ठरला. एक दुर्घटना अन् तीन मित्र कायमचीच दीर्घ प्रवासाला निघून गेली. वाचा नेमके काय घडले?

नाशिक : रात्रीची वेळ...तीन मित्रांचा एका नातेवाइकाकडून परततांनाचा स्कुटीवरील ट्रिपल सीट प्रवास. स्माईल करत फोटो काढून व्हॉट्सअ‍ॅपवर 'लाँग ड्राइव्ह विथ ब्रदर' स्टेट्सही टाकला. पण ते हास्य अन् तो फोटो ही अखेरचाच ठरला. एक दुर्घटना अन् तीन मित्र कायमचीच दीर्घ प्रवासाला निघून गेली. वाचा नेमके काय घडले?

अशी आहे घटना

नाशिक - पेठ महामार्गावर उमराळे गावाजवळील कन्हैया ढाब्याजवळ स्कुटी आणि पिकअप यांच्यात झालेल्या हा भीषण अपघात झाला. रोहित शार्दूल (रा. दिवा, मुंबई), निशांत मोहिते (रा. पंचवटी, नाशिक), अनिकेत मेहरा (रा. अवनखेड, ता. दिंडोरी) हे तीन मित्र स्कुटीवरून नातेवाइकांकडे गेले होते. तेथून परतताना त्यांनी रस्त्यावर मोबाइलमध्ये काही फोटो काढले. 'लाँग ड्राइव्ह विथ ब्रदर' असे नमूद करीत हे फोटो त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला टाकले. पुढच्या काही वेळात ते स्कुटीवरून (एमएच १५/एचए ९२१२) निघाले असता त्यांची उमराळेजवळ पिकअपशी (एमएच १५/ईजी ५१०२) समोरासमोर धडक झाली. त्यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. स्थानिकांनी मदतकार्य केले. उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, डॉ. गिरीश मोहिते यांनीही दवाखान्यात मदतकार्य केले. 

हेही वाचा >  कैद्याची मास्कच्या नाडीने गळफास लावून आत्महत्या; नाशिक मध्यवर्ती कारागृहातील घटना

कुटुंबियांचा आक्रोश

घडलेल्या दुर्देवी घटनेबाबत दिंडोरी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. दिंडोरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण, दिंडोरीचे हवालदार वाघ, युवराज खांडवी आदी तपास करीत आहेत.

हेही वाचा > विनानोंदणी ऑक्सिजन पुरवठ्यातून नाशिकच्या सात कंपन्याचे पितळ उघड; कंपन्यांवर नियंत्रण कुणाचे? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three friends died in the accident nashik marathi news