CoronaUpdate : जिल्ह्यात कोरोनाच्‍या तीन लाख चाचण्या; पॉझिटिव्‍ह रुग्णांचे प्रमाण २८.५४ टक्‍के 

Three lakh corona tests completed in the district nashik marathi news
Three lakh corona tests completed in the district nashik marathi news

नाशिक : जिल्‍ह्‍यातील कोरोनाच्‍या चाचण्यांनी तीन लाखांचा टप्पा पूर्ण केला असून, सोमवार (ता.१२) पर्यंत ३ लाख ०१ हजार ३९६ रूग्‍णांचे स्‍वॅब तपासले आहेत. यापैकी ८६ हजार ००४ रूग्‍ण पॉझिटीव्‍ह आले असून, हे प्रमाण २८.५४ टक्‍के आहे. तर २ लाख १४ हजार ००५ रूग्‍णांचे अहवाल निगेटिव्‍ह आले असून, हे प्रमाण ७१ टक्‍के आहे.

पाचशेपेक्षा कमी बाधित

सायंकाळी उशीरापर्यंत १ हजार ३८७ अहवाल प्रलंबित होते. दरम्‍यान सलग दुसऱ्या दिवशी दिवसभरात आढळलेल्‍या बाधितांची संख्या पाचशेपेक्षा कमी राहिली. नव्‍याने ४९३ बाधित आढळले असतांना, ७३७ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. दहा रूग्‍णांचा मृत्‍यू झाल्‍याची नोंद आहे. 

एकूण बाधितांची संख्या 

सोमवारी नव्‍याने आढळलेल्‍या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरातील २८०, नाशिक ग्रामीणचे १९१, मालेगावचे अकरा तर जिल्‍हाबाह्य अकरा रूग्‍णांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर कोरोनामुक्‍त झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक शहरातील ३९०, नाशिक ग्रामीणचे २९२, मालेगाव ४८ तर जिल्‍हाबाह्य सात रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. दहा मृतांमध्ये नाशिक शहरातील चार, नाशिक ग्रामीणच्‍या सहा रूग्‍णांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे. यातून जिल्‍ह्‍यातील एकूण बाधितांची संख्या ८६ हजार ००४ झाली आहे. यापैकी ७६ हजार ९८५ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली असून, १ हजार ५३३ रूग्‍णांचा मृत्‍यू झालेला आहे. सद्य स्‍थितीत ७ हजार ४८६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ७३२, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ९०, मालेगाव महापालिका हद्दीत आठ, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात १६, जिल्‍हा रूग्‍णालयात चार संशयित दाखल झाले आहेत. 


स्‍वॅब चाचण्यांचे महत्त्वाचे टप्पे व बाधितांचे प्रमाण असे

दिनांक, एकूण चाचण्या, पॉझिटीव्‍ह,  निगेटीव्‍ह 
१७ ऑगस्‍ट, १,०१,६०४,  २५,२८८,  ७५,११८ 
१५ सप्‍टेंबर, २,००,५८८, ५५,९४०,  १,४२,९७८ 
१२ ऑक्‍टोबर, ३,०१,३९६, ८६,००४, २,१४,००५  

 
संपादन - रोहित कणसे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com