थरारक! लॉकडाऊनमध्ये झाला मोठा गैरसमज..दरोडेखोर समजून निष्पापांचा घेतला दगडाने ठेचून जीव!

lockdown murder.png
lockdown murder.png

नाशिक : मुंबईत कांदिवलीतुन तिघेजण कारने दादरा नगर हवेलीमार्गे सुरतकडे जायला निघाले होते. लॉकडाऊनमुळे रात्री आडरस्त्याने जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. इको कार घेऊन ते निघाले आणि सायवन गड चिंचले रस्त्यावरून सुरतकडे चालले होते. रात्री साडेदहा-अकरा वाजण्याच्या दरम्यान या गावात गस्त घालणार्‍या गावकर्‍यांनी त्यांची गाडी अडवली आणि हटकले. आणि मग जे काही घडले ते थरारक होते.

असा घडला धक्कादायक प्रकार
पालघर जिल्ह्याच्या काही भागात सध्या चोर, दरोडेखोर फिरत असल्याच्या अफवांना उधाण आले आहे. यामुळे स्थानिक लोक रात्रीची गस्त घालत आहेत. संशयावरून गुरुवारी रात्री तर गावकर्‍यांनी तिघांचा जीव घेतला. 
मुंबईत कांदिवलीतुन तिघेजण कारने दादरा नगर हवेलीमार्गे सुरतकडे जायला निघाले होते. लॉकडाऊनमुळे रात्री आडरस्त्याने जाण्याचा त्यांचा प्रयत्न होता. इको कार घेऊन ते निघाले आणि सायवन गड चिंचले रस्त्यावरून सुरतकडे चालले होते. रात्री साडेदहा-अकरा वाजण्याच्या दरम्यान या गावात गस्त घालणार्‍या गावकर्‍यांनी त्यांची गाडी अडवली आणि हटकले. दरोडेखोर असल्याच्या संशयावरून गावकर्‍यांनी या तिघांना जबर मारहाण केली.

निघृण हल्ल्यात तिघांचाही मृत्यू

कासा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना पोलिसांनी आपल्या गाडीमध्ये घातले आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण गावकर्‍यांनी पोलिसांवरही हल्ला केला. तसेच पोलिसांच्या गाडीतच तिघांना पुन्हा दगड आणि लाकडाने ठेचून मारले. या हल्ल्यात तिघांचाही मृत्यू झाला. सुशिलगिरी महाराज (वय 30 वर्षे), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (वय 70 वर्षे) आणि चालक निलेश तेलगडे (वय 30 वर्षे) अशी तिघा मृतांची नावे आहेत. हल्लेखोरांनी इको कार आणि पोलिसांच्या तीन गाड्यांचीही तोडफोड केली. या हल्ल्यात दोन पोलीसही जखमी झाले आहेत.

तिघांमध्ये त्र्यंबकेश्वरचे महंत कल्पवृक्षगिरी महाराज

देशभरात लॉकडाऊन सुरू असताना रात्रीच्या वेळी सुरतकडे जाणाऱ्या तिघांची कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तिघांची जमावाने दरोडेखोर समजून हत्त्या केली आहे.  या तिघांमध्ये त्र्यंबकेश्वर येथील मौनीबाबा मठ दक्षिण मुखी हनुमान मंदीर येथील महंत कल्पवृक्षगिरी महाराज यांचा समावेश आहे. 

मृत्युची बातमी आल्याने भक्त परिवारांमध्ये हळहळ
त्र्यंबकेश्वर येथे दक्षिणमुखी हनुमान मंदिर टेकडीवर मौनी बाबा आश्रम आहे.याठिकाणी असलेल्या मौनीबाबा ब्रह्मलीन झाल्या नंतर महंत कल्पवृक्षगिरी याठिकाणी 25 वर्ष वास्तव्य करीत होते.  त्यांचा कांदिवली  येथे आश्रम आहे. या प्रकरणी पालघर पोलीसांनी ओळख पटविण्यासाठी त्र्यंबकेश्वर पोलीसांशी संपर्क साधला होता  अशी माहिती पोलीस उपअधीक्षक भीमाशंकर ढोले यांनी दिली. अधिकार्‍यांनी दिली  कल्पवृक्षगिरी यांच्या  मृत्युची बातमी आल्याने भक्त परिवारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com