बिबट्याला बेशुद्ध करुनच सोडणार! दारणा खोऱ्यात तीन पथकांची करडी नजर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 18 June 2020

गेल्या दोन दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याच्या दोन दुर्दैवी घटना घडल्या होत्या. गेल्या तीन महिन्यांमध्ये परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात पाच जणांना प्राण गमवावे लगल्याने दारणा नदीच्या खोऱ्यातील परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिक : गेल्या दोन दिवसांत बिबट्याच्या हल्ल्याच्या दोन दुर्दैवी घटना घडल्या होत्या. गेल्या तीन महिन्यांमध्ये परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात पाच जणांना प्राण गमवावे लगल्याने दारणा नदीच्या खोऱ्यातील परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरातील वावर असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी ठिकठिकाणी पिंजरे लावलेले आहेत. याशिवाय बिबट्याला बेशुद्ध करून पकडण्यासाठी दारणा खोऱ्यात तीन पथके तैनात केली आहेत. यात बोरीवलीतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचाही समावेश आहे. 

बोरीवलीच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचाही समावेश 
दोनवाडे येथे 76 वर्षीय वृद्धाचा, तर बाभळेश्‍वर परिसरात तीनवर्षीय चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. एकंदरीत निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणात बिबट्याला जेरबंद करण्याकरिता तातडीचे आदेश वनमंत्री संजय राठोड यांनी नाशिक वन विभागाला दिले आहेत. या परिसरात वावर असलेला बिबट्या नरभक्षक झाल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या पार्श्‍वभूमीवर नाशिक पश्‍चिम विभागाची दोन पथके तसेच बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांचे पथक बिबट्याच्या शोधार्थ पाठविले आहे.

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

तीन पथके दारणा खोऱ्यात 

यापूर्वीच परिसरात पिंजरे लावलेले असले तरी त्यात बिबट्या येत नसल्यामुळे ट्रॅन्क्‍युलाइज गनद्वारे बेशुद्ध करण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे समजते. वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी या संदर्भात आदेश दिले असून, त्याअनुषंगाने तिन्ही पथके दारणा खोऱ्यात करडी नजर ठेवून असणार आहेत. 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three squads in Darna valley to catch leopard nashik marathi news