नाशिकहून नागपूर, सोलापूरसाठी उद्यापासून बसगाडी! 'असे' असणार नियोजन; वाचा सविस्तर

अरुण मलाणी
Sunday, 13 September 2020

नाशिकहून नागपूर, सोलापूरसह अन्‍य विविध शहरांसाठी उद्या सोमवार (ता.१४) पासून बसगाड्या सोडण्यात येणार आहे. यातील नागपूरसाठीची साधी शयन यान बस सेवा सुरू केली जात असून या गाड्या नवीन सीबीएस बसस्‍थानकावरुन सुटणार असल्‍याचे महामंडळाच्‍या अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

नाशिक : अनलॉकच्‍या प्रक्रियेत महाराष्ट्र राज्‍य मार्ग परीवहन महामंडळातर्फे जिल्‍हांतर्गत व जिल्‍हाबाह्य ठिकाणांवर बसगाड्या उपलब्‍ध करून दिलेल्या आहेत. नाशिकहून नागपूर, सोलापूरसह अन्‍य विविध शहरांसाठी उद्या सोमवार (ता.१४) पासून बसगाड्या सोडण्यात येणार आहे. यातील नागपूरसाठीची साधी शयन यान बस सेवा सुरू केली जात असून या गाड्या नवीन सीबीएस बसस्‍थानकावरुन सुटणार असल्‍याचे महामंडळाच्‍या अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

असे आहे नियोजन

एसटी महामंडळातर्फे दिलेल्‍या माहितीनुसार उद्या (ता.१४) विविध मार्गांवर बसगाड्या सुरू होत आहेत. यापैकी नाशिकहून नागपूरसाठी साधी शयन यान बस सेवा सुरू होत आहे. नाशिकहून रात्री आठला मालेगावहून सव्वा दहाला, धुळ्याहून बारा वाजता, जळगावहून रात्री दोन वाजून पाच मिनीटांनी, भुसावळहून रात्री पावणे तीनला ही बस उपलब्‍ध होईल. तसेच नागपूरहून नाशिक करत ही बस रात्री आठ वाजता सोडली जाईल. या मार्गाशिवाय अन्‍य काही मार्गांवरदेखील बससेवा सुरू होणार आहे. यात नाशिक सोलापूर मार्गावर सकाळी साडे नऊ व रात्री आठ वाजता बस उपलब्‍ध असेल.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

मास्‍कचा वापर करणे बंधनकारक असणार

नाशिक-अकोला मार्गासाठी सकाळी साडे आठला, नाशिक-लोणारकरीता सकाळी साडे सातला बस उपलब्‍ध असेल. नांदगाव परळी वैजनाथकरीता सव्वा नऊला गाडी सोडली जाणार आहे. नांदगाव देवुळगाव राजा करीता अकराला गाडी सोडली जाईल. यापूर्वीच्‍या सूचनांप्रमाणे वाहतुक करणाऱ्या प्रवाशांना मास्‍कचा वापर करणे बंधनकारक असणार आहे. तसेच सोशल डिस्‍टंसिंगसह अन्‍य विविध उपाययोजना केल्‍या जाणार असल्‍याचेही महामंडळातर्फे स्‍पष्ट केले आहे. 

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From tomorrow, there will be buses for Nagpur, Solapu, on some other routes nashik marathi news