
गेल्या ऑक्टोबरमध्ये व नोव्हेंबरचे काही दिवस नव्याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या घटली होती. परंतु आता पुन्हा या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गुरूवारी (ता.26) दिवसभरात 441 रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले.
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रूग्ण आढळल्यापासून गेल्या काही कालावधीत रोज सात्याने नव्याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची भर पडते आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 99 हजार 822 कोरोना बाधित आढळले असून, यापैकी 95 हजार 339 रूग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. 1 हजार 778 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 2 हजार 705 बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत. गुरूवारी (ता.26) तब्बल 441 कोरोना बाधित आढळून आले.
दिवसभरात 441 रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह
गेल्या ऑक्टोबरमध्ये व नोव्हेंबरचे काही दिवस नव्याने आढळणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या घटली होती. परंतु आता पुन्हा या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गुरूवारी (ता.26) दिवसभरात 441 रूग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. यापैकी 280 नाशिक शहर, 141 नाशिक ग्रामीण, 13 मालेगाव तर जिल्हा बाहेरील सात रूग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या 493 रूग्णांमध्ये नाशिक शहरातील 390, नाशिक ग्रामीणमधील 86, मालेगाव महापालिका हद्दीतील 11 तर जिल्हाबाहेरील सहा रूग्णांनी काेरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. दिवसभरात पाच रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यात नाशिक शहरातील तीन, नाशिक ग्रामीणमधील दोन रूग्णांचा समावेश आहे.
हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता
1 हजार 645 अहवाल प्रलंबित
यातून जिल्ह्यातील आजवरच्या एकूण कोरोना बाधितांची संख्या 99 हजार 822 झाली आहे. यापैकी 95 हजार 339 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 1 हजार 778 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात दाखल रूग्णांमध्ये नाशिक महापालिका रूग्णालये व गृहविलगीकरणात 1 हजार 375, नाशिक ग्रामीण रूग्णालये व गृहविलगीकरणात 47, मालेगाव क्षेत्रातील रूग्णालयांत आठ, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात 8 आणि जिल्हा रूग्णालयात आठ रूग्ण दाखल झत्तले आहेत. सायंकाळी उशीरापर्यंत 1 हजार 645 अहवाल प्रलंबित होते. यापैकी 1 हजार 154 नाशिक शहर, 412 नाशिक ग्रामीण, तर मालेगावच्या 79 रूग्णांना अहवालाची प्रतिक्षा आहे.
हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ