नाशिक शहरातील सिग्नलची देखभाल आता पोलिसांकडे; वाहतूक नियंत्रणासोबत नियोजनही 

विक्रांत मते
Monday, 22 February 2021

शहरातील वाहतूक नियंत्रणासाठीच्या ४७ सिग्नलची व्यवस्था आता महापालिकेकडून शहर पोलिसांकडे आली आहे. शहरातील कमांड कंट्रोल रूममधून त्यांचे नियंत्रण सुरू होणार आहे. त्यासाठी पोलिस महापालिका यांच्यात पत्रव्यवहारही सुरू आहे. त्यामुळे यापुढे वाहतूक नियंत्रणासोबतच वाहतूक नियोजनाचे आणि सिग्नल देखभाल दुरुस्तीचे कामकाज वाहतूक पोलिसांवर येऊन पडणार आहे. 

नाशिक : शहरातील वाहतूक नियंत्रणासाठीच्या ४७ सिग्नलची व्यवस्था आता महापालिकेकडून शहर पोलिसांकडे आली आहे. शहरातील कमांड कंट्रोल रूममधून त्यांचे नियंत्रण सुरू होणार आहे. त्यासाठी पोलिस महापालिका यांच्यात पत्रव्यवहारही सुरू आहे. त्यामुळे यापुढे वाहतूक नियंत्रणासोबतच वाहतूक नियोजनाचे आणि सिग्नल देखभाल दुरुस्तीचे कामकाज वाहतूक पोलिसांवर येऊन पडणार आहे. 

स्मार्टसिटी उपक्रमात आणि त्यापूर्वी सिंहस्थ कुंभमेळ्यापासून शहरातील वाहतूक नियंत्रणासह सीसीटीव्ही कॅमेऱ्यामार्फत शहरातील रस्त्यांवरील गर्दीवर नियंत्रणासाठी अधिकार शहर पोलिसांकडे आणण्याचे नियोजन आहे. त्यात शहर पोलिस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात कमांड ॲन्ड कंट्रोल प्रणालीचा उदय झाला. सिंहस्थ कुंभमेळ्यात या कमांड कंट्रोल रूमचा सर्वप्रथम प्रभावी वापर झाला. सिंहस्थ कुंभमेळ्याला जमलेल्या लाखो भाविकांच्या गर्दीचे नियंत्रण सीसीटीव्हीद्वारे करून गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवण्याचा उपक्रम यशस्वी ठरल्यानंतर आता स्मार्टसिटी उपक्रमात शहरभर कमांड कंट्रोल रूमद्वारे वाहतूक व्यवस्थेचे नियंत्रण करण्याचे दीर्घकालीन नियोजन सुरू झाले आहे. या नियोजनाचा भाग म्हणून शहरातील सिग्नल व्यवस्थेचे नियंत्रण आणि नियोजन शहर पोलिसांकडे येणार आहे. 

हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ

सिग्नल नियंत्रकही पोलिस 

शहरातील वाहतूक पोलिसांच्या ड्युट्या नियोजन करताना त्यांना ठिकठिकाणच्या सिग्नलवर ड्युट्यांचे वाटप होते. सिग्नलवरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवताना आता पोलिसांना जागोजागीचे सिग्नल बंद करणे व सुरू करणे, वीजपुरवठा बंद झाल्यानंतर पुन्हा ते सुरू करणे ही कामे करावी लागत आहे. याशिवाय तांत्रिक कारणातून सिग्नलव्यवस्था बंद झाली म्हणजे बेशिस्त वाहतूक सर्रास सुरू होते. एकाचवेळी त्या बेशिस्त वाहतुकीचे नियोजन करताना दुसरीकडे सिग्नल पूर्ववत सुरू करण्यासाठी सिग्नल दुरुस्तीसाठी विद्युत तंत्रज्ञ शोधण्यासारखी कामे करावी लागणार आहेत. 

हेही  वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय 

तांत्रिक प्रशिक्षण 

कमांड कंट्रोल रूममधून शहराची वाहतूकव्यवस्था नियंत्रण करण्याचे प्रयत्न अद्ययावत व्यवस्थेला अनुसरून असेच असणार आहे. मात्र, सीसीटीव्ही पाहून दंड आकारणे, गर्दीच्या ठिकाणची वाहतूक व्यवस्था एनवेळी वळविणे यांसारख्या निर्णयाशिवाय गुन्हेगार हुडकून काढण्यासाठी पोलिसांना ही यंत्रणा मदत ठरणार आहे. पण प्रश्न तांत्रिक प्रशिक्षणाची गरज भासणार आहे. वीज गेल्याने किंवा तांत्रिक कारणांनी सिग्नल बंद पडलाच तर एनवेळी 
पोलिसांनी वाहतूक सोडून तंत्रज्ञ शोधत फिरावे का? हे आणि असे प्रश्नही उपस्थित होणार आहेत. त्यामुळे सिग्नलसोबत त्याच्या देखभाल दुरुस्तीची व्यवस्था पोलिसांना उभी करावी लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic planning and signal maintenance will be the responsibility of the traffic police Nashik marathi news