
नाशिक/निफाड : श्रावणातील कोसळणाऱ्या सरी आणि सभोवताली असणारे अल्हाददायक वातावरण वाऱ्यावर वरती डोलणारे गवताचे पाते अशा निसर्गरम्य वातावरणात क्षेत्र लोणजाई देवस्थान परिसर हिरवाईने नटला असून उन्हाळ्यात होरपळलेल्या झाडांना नव पालवी फुटल्याने निफाडकरांच्या आकर्षनाचा केंद्र बिंदु ठरले आहे.
निफाड तालुक्यातील एकमेव डोंगर म्हणून ओळख असलेल्या श्रीक्षेत्र लोन जाई देवस्थानच्या या डोंगरावर निफाड पंचायत समिती सह विविध संस्था शाळा महाविद्यालय परिसरातील ग्रामस्थ यांच्यावतीने वड, पिंपळ, सिताफळ, आंबे, बाभूळ, निंब, यासह अनेक प्रजातींचे झाडे लावण्यात आली त्यामुळे या परिसरातील रूपडे पालटले कधी काळी उघडा बोडका वाटणाऱ्या डोंगराने हिरवाई चा शालू परिधान केल्याचे चित्र निर्माण झाले आहे परंतु गतवर्षी काही अज्ञातांनी या लावलेल्या झाडांना आग लावली होती यात होरपळलेल्या झाडांना आता पालवी फुटली आहे या झाडांची काळजी स्थानिक घेत आहेत लोणजाई आणि परिसरात सध्याचा सुरु असलेल्या पावसाळा आणि परिसरातील सर्वदूर पसरलेले हिरवे वातावरण निफाड कराना आकर्षित करीत असून या वातावरणात अनेक जण श्रीक्षेत्र लोंढे देवस्थान ला भेट देत निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद घेत आहे.
ऐकुण झाडे 8000
चिंच 900
आवळा 1700
जाभुळ 1500 आबे
370 सिताफळ
500 वड पिपळ व इतर जंगली झाडे
श्रीक्षेत्र लोण जाई देवस्थान परिसरात निफाड पंचायत समितीच्या माध्यमातून विविध संस्थांना सोबत घेत या परिसराचा कायापालट करण्याचे धोरण निश्चित केले आहे त्यामुळे सध्याची दिसणारी हिरवळ आणि डोलणारी झाडे आपल्या दृष्टीस पडतात आणि त्यासाठी आम्ही मेहनत घेत आहोत
- संजय शेवाळे, पंचायत समिती सदस्य निफाड
निफाड करांचा आराध्य दैवत श्रीक्षेत्र लोणजाई देवस्थान परिसर सध्या हिरवाईने नटलेला आहे या परिसरात होत असलेली विविध विकास कामे आणि परिसरात उभी राहिलेली वनराई भाविकांसाठी तसेच निफाड करांसाठी एक अध्यात्मिक केंद्र म्हणून पुढे येत आहे
- संजय शिंदे, व्हा. चेअरमन मुक्ताई पाणीवापर संस्था शिवडी
संपादन - रोहित कणसे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.