दिंडोरी रोडवर तिहेरी भीषण अपघात : चालकाने अचानक दाबला ब्रेक; वाहनांचे नुकसान

योगेश मोरे
Thursday, 24 December 2020

यात या कारचेही नुकसान झाले असून, अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

म्हसरूळ (जि.नाशिक) : दिंडोरी रोडवर एका भरधाव ट्रकने कारला धडक देत चालकाने अचानक दाबलेल्या ब्रेकमुळे तिहेरी अपघात झाला. यात एक जण जखमी झाला असून, दोन वाहनांचे नुकसान झाले आहे.

दिंडोरी रोडवर तिहेरी अपघात

फिर्यादी तुषार गायकवाड हे बुधवारी (ता.२३) दुपारच्या सुमारास त्यांच्या कारने (क्र. एमएच१५ जीआर ५७२४) दिंडोरी रोड कडून वणीच्या दिशेने जात असताना एका साहेबाज हॉटेलसमोर पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने ( क्र. एम एच१५ डि के ६९९९) जोरदार धडक दिली. यात कारचे नुकसान झाले असून, कारचालकाला मुका मार लागला आहे. तसेच, ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे ट्रकच्या पाठीमागून येत असलेली कार (क्र. एम एच १२ एफ के ९३३३) ट्रकवर धडकली. यात या कारचेही नुकसान झाले असून, अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रकचालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार देवरे अधिक तपास करीत आहे.

हेही वाचा - शुभमंगल सावधान आणि 'त्यांच्या' पासूनही जरा सावधान! टार्गेट सप्तपदीचा मुहूर्त

ट्रकचालकविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी तुषार यादव गायकवाड (रा. अंबड- लिंकरोड) यांच्या फिर्यादीवरून संशयित ट्रकचालक गणेश संजय डांबेधर (रा.नाशिकरोड) याच्याविरोधात म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - निनावी पत्रावरून पोलीसांनी लावला शोध, हाती लागली धक्कादायक माहिती

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Triple accident on Dindori Road nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: