थरारक! भरधाव ट्रकची नऊ वाहनांना धडक; चहाच्या टपरीचा अक्षरश: चुराडा 

राजेंद्र अंकार
Monday, 19 October 2020

भरधाव जाताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने नऊ वाहनांसह एक चहाची टपरी चिरडून टाकली. सकाळच्या सुमारास सिन्नर महाविद्यालयासमोर ही घटना घडली

सिन्नर (जि.नाशिक) : भरधाव जाताना चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकने नऊ वाहनांसह एक चहाची टपरी चिरडून टाकली. सकाळच्या सुमारास सिन्नर महाविद्यालयासमोर ही घटना घडली

चहाच्या टपरीचा अक्षरश: चुराडा
एकलहरे येथून राख घेऊन ट्रक (एमएच १५, ईजी ९१४२) सिन्नरकडे भरधाव जात होता. सकाळी साडेसातला ट्रक सिन्नर महाविद्यालयाजवळ गतिरोधकाजवळ आला असता, चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने आणि ट्रकने मुसळगाव येथील एका कंपनीची इन्होव्हा कारला (एमएच १५, एके १४८५) धडक दिली. त्यानंतर वेगात असलेला ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीवर जात त्याचा चुराडा करत महाविद्यालयासमोरील व्यापारी संकुलात घुसला. तेथे गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या सहा चारचाकी व तीन दुचाकी वाहनांचा चुराडा केला. सकाळची वेळ होती म्हणून परिसरात वर्दळ नसल्याने मोठा अनर्थ टळला. अपघात घडताच ट्रकचालक फरारी झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोचत पुढील कार्यवाही केली. . या घटनेत सुदैवाने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. घटना घडल्यानंतर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

घटनेची पुनरावृत्ती 
गेल्या अनेक वर्षांपासून महाविद्यालयासमोर पद्मा साखरे पतीसह चहाची टपरी चालवितात. दीड-दोन वर्षांपूर्वी याच ठिकाणी अशाच पद्धतीने एक ट्रक ताबा सुटल्याने घुसला होता. त्या वेळी थोडक्यात ट्रक हा टपरीजवळून जात बॅंकेच्या एटीएमचे नुकसान केले. त्या वेळीही कोणालाही इजा झाली नव्हती. आजही त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली. आज ज्या चहाच्या व्यवसायावर अवलंबून रहात होत्या तेच नियतीने हिरावून नेल्याने त्या हतबल झाल्या. 

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: truck hit nine vehicles nashik marathi news