ब्रेकिंग : विंचूर-प्रकाशा महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू तर ११ जण गंभीर

रणधीर भामरे
Friday, 25 September 2020

अचानक दिसलेला खड्डा चूकवण्याच्या नादात ट्रकच्या मागच्या चाकाजवळ पिकअप अडकला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर रुग्णांना सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ्असून अत्यवस्थ असलेल्या तीन जणांना नाशिक येथे तर नऊ जणांना मालेगाव येथे हलवण्यात आले आहे

नाशिक/वीरगाव : विंचूर-प्रकाशा महामार्ग क्रमांक ७ वरील वनोली (ता.बागलाण) जवळ मालवाहतूक ट्रक व पिकअप यांच्यात भीषण अपघात झाला.  या अपघातात एकजण जागीच ठार झाला तर इतर ११ जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.

नाशिक येथून काम संपवून शिरवाडे (ता. साक्री ) येथील मजूर पीक अप क्र.एम एच १५ एफव्ही ४८३९ या वाहनाने घरी परतत होते. वनोली नजीक म्हसोबा मंदिराजवळ खड्डे टाळण्याच्या नादात असताना समोरून येणाऱ्या मालवाहक ट्रक क्र. टिएन ८८ वाय ८३९९ या वाहनावर आदळल्याने पिकअप या वाहनात बसलेले 35 ते 48 प्रवाशी फेकले गेले. अचानक दिसलेला खड्डा टाळण्याच्या नादात ट्रकच्या मागच्या चाकाजवळ पिकअप अडकला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर रुग्णांना सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले ्असून अत्यवस्थ असलेल्या तीन जणांना नाशिक येथे तर नऊ जणांना मालेगाव येथे हलवण्यात आले आहे. चार महिला, चार पुरुष व चार लहान मुले सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत आहेत.

हेही वाचा > जिल्ह्यात पुन्हा रेमडेसिव्हिरच्या टंचाईसह काळा बाजार; रुग्णांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप 

कामराज रबा ठाकरे (वय 42) यांचा जागीच मृत्यू झाला असून बाबुराव सोनवणे (वय 55), महेंद्र देसाई (वय 27), बंडू सोनवणे (वय 40 )यांना नाशिक येथे हलविण्यात आले. तर सुरेश पवार (वय 8), पूजा पवार (वय 8), गणेश सोनवणे (वय 4), गोरख सोनवणे (वय 35), सुनंदा सोनवणे (वय 28), अर्जुन सोनवणे (वय 30), गोविंदा सोनवणे वय 30, लक्ष्मण सोनवणे (वय 28), जोशविन सोनवणे (वय 18) यांना मालेगाव येथे हलविण्यात आले आहे.

हेही वाचा > सराईत गुंड पम्याची दहशत झाली फुस्स! भर बाजारात जेव्हा पोलिसांनी काढली वरात

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: truck pick up accident nashik marathi news