मोहिमेचा तामझाम जोरात उद्देश मात्र केरात; खरे कोरोनायोद्धेच लसीकरणापासून उपेक्षितच

corona ward.jpg
corona ward.jpg

नाशिक : बहुचर्चित कोरोनावर मात करण्यासाठी शनिवार (ता.१६)पासून सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेचा चांगलाच बोलबाला झाला. कोरी इमारत, रंगरंगोटीपासून रांगोळ्यापर्यंतचा मोठा तामझाम करून प्रारंभाचा बार उडविला गेला. पण या सगळ्यात जास्त खटकणारी बाब म्हणजे दहा महिन्यांपासून कोरोना कक्षात प्रत्यक्ष कोरोना बाधितांसोबत जीव धोक्यात घालून काम करणारे कंत्राटी आरोग्यसेवकच दुर्लक्षित राहिले. 

देशभर गाजावाजा करीत मोहिमेचा प्रारंभ

नाशिक जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या जिल्हा रुग्णालयातील हा दुजाभाव जास्त खटकणारा होता. कोरोनामुळे जगाचे अर्थकारण, समाजकारण ढवळून काढले. अनेकांचे जीव गेले. जनजीवन पूर्णपणे ठप्प पडले. बरेच जण देशोधडीला लागले. अनेकांचे रोजगार गेले. हे सगळे एकट्या कोरोनामुळे घडले. साहजिकच त्यावर विजय मिळविण्यासाठी तितक्याच जोरकसपणे प्रयत्न झाले. त्यातून कोरोना लसीचा जन्म झाला. आज मोठ्या धूमधडाक्यात विशेष इव्हेंट घेऊन देशभर गाजावाजा करीत मोहिमेचा प्रारंभ झाला. 

लसीकरणाचे उद्दिष्ट्यपूर्तीचा आटापिटा

एवढा मोठा दणका दिलेल्या कोरोनावर विजय मिळवून देणारी लस मिळण्यासाठी लोकांत उत्सुकता ताणली गेली, असे मात्र अजिबात चित्र नव्हते. कुणी घुसखोरी करू नये म्हणून मोठा बंदोबस्त लावला होता. घुसखोरी तर दूरच ज्यांना निवडले गेले अशा १०० आरोग्य सेवकांचे उद्दिष्ट पूर्ण करताना आज यंत्रणेलाच नाकीनऊ आले. जिल्हा रुग्णालयात सकाळी ड्यूटी करून घरी गेलेल्यांना दुपारी चारला पुन्हा लस घेण्यासाठी बोलावून घेण्याची वेळ आली. वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी व डॉक्टरांनी आरोग्य सेवकांना संधी दिली. पण जे कोरोना कक्षात काम करीत नाही, त्यांची नावे होती. त्यामुळे कोरोना लसीकरणाची ही मोहीम पूर्णपणे ऐच्छिक असल्याने घरी गेलेल्यांना कर्मचाऱ्यांना बोलावून लसीकरणाचे उद्दिष्ट्यपूर्तीचा आटापिटा पाहायला मिळाला. 

योद्धे उपेक्षित 

कोरोनायोद्धा म्हणून ज्यांची दखल घ्यावी, अशात जिल्हा रुग्णालयात थेट कोरोना कक्षात काम करणाऱ्या आरोग्यसेवकांचे काम सर्वाधिक जोखमीचे होते. थेट प्रत्यक्ष कोरोना रुग्णांची सेवा करताना ज्यांना सर्वाधिक लागण होण्याची भीती, अशा कोरोना कक्षातील २० आरोग्य सेवकांना मात्र यात कुठेही संधी दिली गेली नाही. उलट इतर विविध कक्षांत काम करणाऱ्या आरोग्यसेवक व परिचारिकांना संधी देताना याशिवाय पुरेशा लस (डोस) उपलब्ध असूनही केवळ कंत्राटी म्हणून कोरोना कक्षातील खरे योद्धे लसीकरणाच्या धामधुमीत दुर्लक्षित राहिले. आजच्या ऐतिहासिक लसीकरणाच्या दिवशी हेही खटकणारे ठरले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com