HSC Result2020 : नाशिक विभागातील बारावीत 88.87 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण...मुलींची बाजी कायम!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जुलै 2020

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागातील 88.87 टक्के विद्यार्थी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. गेल्या 3 वर्षांच्या तुलनेत यंदा निकाल उंचावला असून निकालात मुलींनी यशाचा वरचष्मा कायम ठेवला आहे. 

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत नाशिक विभागातील 88.87 टक्के विद्यार्थी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे. गेल्या 3 वर्षांच्या तुलनेत यंदा निकाल उंचावला असून निकालात मुलींनी यशाचा वरचष्मा कायम ठेवला आहे. 

मुलींचा यशात वरचष्मा कायम

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी -मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( बारावी) परीक्षेचा नऊ विभागांचा निकाल आज गुरुवारी (ता.16) रोजी लागला. या विभागात पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण येतात. यात कोकण विभागाने बाजी मारली आहे. नाशिक विभागातील 92.54 टक्के मुली तर 86.09 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. 

जिल्हानिहाय मुले आणि मुली उत्तीर्णतेची टक्केवारी :

नाशिक : 86.05-93.67 
धुळे : 89.04-94.06 
जळगाव : 87.45-92.91
नंदुरबार : 77.23-84.26

उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी
 
नाशिक जिल्हा 89.46
धुळे 91.11
जळगाव 89.72 
नंदुरबार 80.35 

3 वर्षांच्या तुलनेत यंदा निकाल उंचावला

मार्च 2019 मध्ये 84.77 
मार्च 2018 मध्ये 86.13 
मार्च 2017 मध्ये 88.22 

हेही वाचा > हायटेक सल्ला पडला महागात; दोन एकरांतील ऊस जळून खाक...नेमके काय घडले?

122 विद्यार्थ्यांवर कारवाई

बारावी परीक्षेत गैरमार्गाचा अवलंब केल्याने 122 विद्यार्थ्यांवर शिक्षण मंडळाने कारवाई केली. त्यात नाशिकमधील 45, धुळ्यातील 8, जळगांव मधील 43, नंदुरबार मधील 26 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गेल्यावर्षीपेक्षा 4 टक्क्यांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

हेही वाचा > आयुक्तांची रात्री उशिरा रुग्णालयात एंट्री...चौकशीत मोठा खुलासा...नेमके काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelfth in Nashik division 88.87 percent students passed nashik marathi news