"संस्कृती..तु आमचा जराही विचार नाही केला गं.." असं म्हणत आईने हंबरडा फोडला

सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

विद्यार्थिनीचे वडील डहाणू येथे संस्कृत विषयाचे शिक्षक आहेत. आई व लहान भाऊ असे तिघे जण ताहाराबाद येथे राहतात. सायंकाळी पाचला तिची आई तिला बघावयास गेली असता, तिचा दरवाजा बंद होता. तिने संस्कृतीला आवाज दिला असता, प्रतिसाद मिळाला नाही.

नाशिक :  ताहाराबाद येथे बारावीच्या विद्यार्थिनीने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. 26) सायंकाळी पाचच्या सुमारास शिवनेरीनगरात घडली. संस्कृती दिनेश पगार (वय 17) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या विद्यार्थिनीचा बुधवारी (ता. 26) रसायनशास्त्र विषयाचा पेपर होता. तो अवघड गेल्याने तिने नैराशातून हे कृत्य केल्याची चर्चा होती. 

सायंकाळी पाचला तिची आई तिला बघावयास गेली..तेव्हा...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत विद्यार्थिनीचे वडील डहाणू येथे संस्कृत विषयाचे शिक्षक आहेत. आई व लहान भाऊ असे तिघे जण ताहाराबाद येथे राहतात. सायंकाळी पाचला तिची आई तिला बघावयास गेली असता, तिचा दरवाजा बंद होता. तिने संस्कृतीला आवाज दिला असता, प्रतिसाद मिळाला नाही. खिडकीतून बघितले असता, संस्कृतीने गळफास घेतला असल्याचे दिसून आले, हे दृश्‍य पाहताच आईने हंबरडा फोडताच शेजारी धावत आले. शेजारच्यांनी दरवाजा तोडला. घटनेची माहिती जायखेडा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच जायखेडा पोलिसांचा ताफा तेथे पोचला. पंचनामा करून पोलिसांनी संस्कृतीचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविला. संस्कृतीच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. जायखेडा पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 
 

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

हेही वाचा > लष्करी जवानाकडून जेव्हा पत्नीची हत्या होते तेव्हा...धक्कादायक घटना!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twelfth student commits suicide in Taharabad Nashik Marathi News