शेतकऱ्यांवर पुन्हा कांदे राखण्याची वेळ! वाखारीत बारा क्विंटल कांद्याची चोरी 

मोठाभाऊ पगार
Wednesday, 30 December 2020

लाल कांद्याचे महागडे रोप आणून कांद्याची लागवड केली होती. नफा नाहीतर खर्च तरी वसूल होईल या आशेने मोठ्या कष्टाने कांदा तयार केला. कांद्याला कलर येईल म्हणून दोन दिवस पातीमध्ये ठेवला होता.

देवळा (जि. नाशिक) : वाखारी (ता. देवळा) येथील शेतकरी दिलीप कचरू भदाणे यांच्या शेतातून १० ते १२ क्विंटल लाल कांद्याची सोमवारी (ता. २८) रात्री चोरी झाल्याने दिवसभर काम करून रात्री पुन्हा कांदे राखण्याची वेळ आली आहे. या चोरीमुळे शेतकरी वर्गात चिंता आणि संताप व्यक्त होत आहे. 

वाखारी येथील शेतकरी दिलीप भदाणे यांनी आपल्या शेतात जवळपास १० ते १२ क्विंटल लाल कांदा विक्रीसाठी तयार करून ठेवला होता. सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी तो चोरून नेला. याबाबत देवळा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

हेही वाचा - सावधान! आतापर्यंत पक्ष्यांच्या जिवावर बेतणारे प्रकार आता माणसांवरही; महिलेचा बळी

विक्रीसाठी बाजारात नेण्याचे होते नियोजन

भदाणे यांनी लाल कांद्याचे महागडे रोप आणून कांद्याची लागवड केली होती. नफा नाहीतर खर्च तरी वसूल होईल या आशेने मोठ्या कष्टाने कांदा तयार केला. कांद्याला कलर येईल म्हणून दोन दिवस पातीमध्ये ठेवला होता. मंगळवारी (ता. २९) तो कांदा विक्रीसाठी मार्केटला नेण्याचे नियोजन होते. मात्र चोरट्यांनी यावर डल्ला मारल्याने शेतकरी भदाणे यांचे सुमारे २० ते २२ हजार रुपयांचे नुकसान झाले. याआधी तालुक्यात उन्हाळ कांदाचोरीच्या घटना घडल्या आहेत. आता पुन्हा लाल कांद्याची चोरी झाल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve quintals of onions were stolen at Wakhari nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: