जिल्ह्यात अकरावी अन् पॉलिटेक्‍निकच्‍या प्रवेशासाठी 'इतक्या' जागा उपलब्ध...वाचा सविस्तर

admission 1.jpg
admission 1.jpg
Updated on

नाशिक : दहावी उत्तीर्ण झालेल्‍या विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयीन शिक्षणाचे वेध लागले आहेत. यंदा निकालाच्‍या टक्‍केवारीत वाढ झाल्‍याने सहाजिकच प्रवेशातही चुरस बघायला मिळणार आहे. शहरात अकरावीच्‍या पंचवीस हजार जागा तर पॉलिटेक्‍निकच्‍या जिल्ह्यात इतक्या जागा आहेत. 

विज्ञान शाखेच्‍या सर्वाधिक जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध

नाशिक शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्‍या २५ हजार ३० जागा उपलब्‍ध आहेत. याशिवाय ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयां मध्येही अकरावीच्‍या जागा उपलब्‍ध असणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील २५ तंत्रनिकेतन (पॉलिटेक्‍निक) येथे पदविका अभ्यासक्रमाच्‍या दहा हजार २०० जागा उपलब्‍ध असतील. अनेक विद्यार्थ्यांचा ओढा विज्ञान शाखेकडे असतो. यातून अकरावीच्‍या विज्ञान शाखेच्‍या सर्वाधिक दहा हजार १६० जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध असतील. गेल्‍या शैक्षणिक वर्षात २०१९-२० मध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील राबविलेल्‍या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत अकरावीचे १८ हजार ६९८ प्रवेश झाले होते, तर सहा हजार ३३२ जागा रिक्‍त राहिल्‍या होत्‍या. 

रिक्‍त जागांची संख्या घटण्याची शक्‍यता 

विज्ञान शाखेत तीन हजार ९९५ प्रवेश होत ९१५ जागा रिक्‍त राहिल्‍या होत्‍या. वाणिज्‍य शाखेत सहा हजार ३४८ प्रवेश, तर दोन हजार २५२ जागा रिक्‍त, तर विज्ञान शाखेत सर्वाधिक सात हजार ४१५ प्रवेश, तर दोन हजार ७४५ जागा रिक्‍त राहिल्‍या होत्‍या. या वर्षी निकालाच्‍या टक्‍केवारीत वाढ झाल्‍याने कट ऑफ वाढण्यासह रिक्‍त जागांची संख्या घटण्याची शक्‍यता जाणकारांकडून व्यक्‍त केली जात आहे. 

शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांत अकरावी जागांची स्‍थिती 
प्रकार कला वाणिज्‍य विज्ञान एचसीव्‍हीसी 

अनुदानित ३,३९० ३,४८० ३,३२० १,३६० 
विनाअनुदानित १,००० ३,४८० ३,६८० ० 
स्‍वयंअर्थसहाय्यित ५२० १,६४० ३,१६० ० 
एकूण ४,९१० ८,६०० १०,१६० १,३६० 

नाशिक विभागातील पॉलिटेक्‍निक व उपलब्‍ध जागांची स्‍थिती 
जिल्‍हा पॉलिटेक्‍निकची संख्या प्रवेशक्षमता 

नाशिक २५ १० हजार २०० 
नगर २५ ८ हजार ६०५ 
धुळे १० २ हजार ८०९ 
जळगाव २१ ५ हजार ७८५ 
नंदुरबार ३ ९०० 

संपादन - किशोरी वाघ


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com