डॉक्टरांनी दोन दिवस दवाखाना काय ठेवला बंद...चर्चेला उधाण..अखेर गाठले पोलीस ठाणे 

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 29 जून 2020

दोन्ही डॉक्‍टरांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा पसरली. त्यातच एका डॉक्टरचा दवाखाना दोन दिवस बंद असल्याने चर्चेत भर पडली. याबाबत जेव्हा डॉक्‍टरांना समजले.. तेव्हा त्यांनी उलटसुलट चर्चेचे खंडन करून आश्‍चर्य व्यक्त केले. 

नाशिक रोड : दोन्ही डॉक्‍टरांना कोरोनाची लागण झाल्याची चर्चा पसरली. त्यातच एका डॉक्टरचा  दवाखाना दोन दिवस बंद असल्याने  चर्चेत  भर पडली. याबाबत जेव्हा डॉक्‍टरांना समजले.. तेव्हा त्यांनी उलटसुलट चर्चेचे खंडन करून आश्‍चर्य व्यक्त केले. 

दोन दिवस ओपीडी बंद काय केली, तर...

लॉकडाउनच्या काळात बहुतेक खासगी दवाखाने बंद असताना आम्ही मात्र ओपीडीच्या माध्यमातून रुग्णसेवा सुरूच ठेवली. व्यक्तिगत कारणास्तव दोन दिवस ओपीडी बंद काय केली, तर समाजमाध्यमांवर आपण कोरोनाबाधित असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. लॉकडाउनकाळात रुग्णसेवा केल्याचे हेच काय ते फळ, अशी खंत नाशिक रोडच्या डॉ. मिलिंद पवार आणि डॉ. अशोक निरगुडे यांच्याकडून व्यक्‍त करण्यात येत आहे. 

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

त्यामुळे चर्चेला अधिकच उधाण

डॉ. मिलिंद पवार यांनी घरगुती कामासाठी दोन दिवस दवाखाना बंद ठेवला होता, तर डॉ. अशोक निरगुडे यांनी दवाखाना पेस्ट कंट्रोल आणि सॅनिटाइजर करण्यासाठी दवाखाना काही दिवस बंद ठेवला. त्यामुळे चर्चेला अधिकच उधाण आले. डॉ. अशोक निरगुडे यांनी सोशल मीडियात आपल्याबाबत सुरू असणाऱ्या उलटसुलट चर्चेबाबत तक्रार दाखल करण्यासाठी नाशिक रोड पोलिस ठाणे गाठले. येथील पोलिसांनी सायबर सेलकडे तक्रार करावी, अशी सूचना केली. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

माझ्या स्वतःच्या जिवाचा विचार केला नाही

रुग्णसेवा अखंडपणे सुरूच आहे. सुरक्षेचे किट वापरून तपासणी केली जाते. माझ्या स्वतःच्या जिवाचा विचार केला नाही. आम्हाला प्रोत्साहन देण्याऐवजी आमचे मनोबल खच्चीकरण केले जात आहे, याविषयी खूप वाईट वाटले. -डॉ. मिलिंद पवार 

काही समाजकंटक सोशल मीडियावर चुकीची अफवा पसरवत आहेत. काही बडे दवाखाने बंद होते. मात्र, आम्ही रुग्णसेवा सुरूच ठेवली, हा आमचा गुन्हा होता काय? -डॉ. अशोक निरगुडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two doctors were annoyed by the talk of corona disease nashik marathi news