...अन् त्या दोन्हीही तरुणी रस्त्यावर फेकल्या गेल्या..मग..

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 19 June 2020

देवळा- नाशिक राज्यमार्गावर गुंजाळनगर येथे शृंगी व श्रद्धा या दोन्ही होंडा ऍक्‍टिव्हाने घरी जात असताना नाशिककडून भरधाव येणाऱ्या ट्रकने  ऍक्‍टिव्हाला धडक दिल्याने या दोन्ही तरुणी रस्त्यावर फेकल्या गेल्या..अन् मग...

नाशिक / देवळा : देवळा- नाशिक राज्यमार्गावर गुंजाळनगर येथे शृंगी व श्रद्धा (22) या दोन्ही होंडा ऍक्‍टिव्हाने घरी जात असताना नाशिककडून भरधाव येणाऱ्या ट्रकने  ऍक्‍टिव्हाला धडक दिल्याने या दोन्ही तरुणी रस्त्यावर फेकल्या गेल्या..अन् मग...

अशी घडली घटना...

गुरुवारी (ता.18) दुपारी बाराच्या सुमारास देवळा- नाशिक राज्यमार्गावर गुंजाळनगर येथे शृंगी रामदास मगर (वय 18) व श्रद्धा सूर्यकांत पाटील (22) या दोन्ही होंडा ऍक्‍टिव्हाने (एमएच41 एपी 1778) घरी जात असताना नाशिककडून भरधाव येणाऱ्या ट्रकने (एमएच 15 जेव्ही 5580) ऍक्‍टिव्हाला धडक दिल्याने या दोन्ही तरुणी रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यांना डोक्‍याला व हातापायांना जबर मार लागला. अपघात घडता क्षणी नागरिकांनी धाव घेऊन या तरुणींना देवळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डोक्‍याला जास्त मार लागला असल्याने पुढील उपचारासाठी दोघींना नाशिकला हलविण्यात आले. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

देवळ्यात ट्रक अपघातात तरुणी वाचल्या 

देवळा- नाशिक मार्गावरील गुंजाळनगर येथे भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या. दैव बलवत्तर म्हणून या अपघातात दोन्ही तरुणींचा जीव वाचला. 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two girls survived a truck accident at the temple nashik marathi news