बारा जनावरांसह दोनशे किलो मांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल 

प्रमोद सावंत
Saturday, 24 October 2020

येथील मोती तालाब भागातील महिला शौचालयामागे जाकिर मोबाईल यांच्या गुदामात छापा टाकून १२ जनावरे व दोनशे किलो मांस जप्त केले.

मालेगाव (जि.नाशिक) : येथील मोती तालाब भागातील महिला शौचालयामागे जाकिर मोबाईल यांच्या गुदामात छापा टाकून १२ जनावरे व दोनशे किलो मांस जप्त केले.

बारा जनावरांसह दोनशे किलो मांस जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

गोवंश हत्याबंदी असतानाही जाकिर हुसेन मोहंमद एहसान (वय ४५) व जियाउर रहेमान नबी कुरेशी ऊर्फ जव्वार (रा. मोती तालाब) जनावरांची कत्तल करून मांसाचे तुकडे करीत होते. पोलिसांनी जाकिर हुसेनला ताब्यात घेतले, तर जियाउर रहेमान फरारी झाला. तीन लाख दहा हजार रुपये किमतीची जनावरे व २० हजार रुपये किमतीचे मांस असा एकूण तीन लाख ३० हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. निरीक्षक दिलीपकुमार पारेकर, सहाय्यक निरीक्षक सागर कोते आदींच्या पथकाने शुक्रवारी (ता. २३) सकाळी सव्वासातच्या सुमारास ही कारवाई केली. शहर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायद्यान्वये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! उपजिल्हाधिकारी दालनात युवकाने अंगावर पेट्रोल ओतले; जिल्हाधिकारी कार्यालयात धावपळ

हेही वाचा >क्षणार्धात संसाराची राखरांगोळी! चव्हाण कुटुंबियांचे ५० हजारांचे नुकसान 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two hundred kilos of meat with twelve animals seized malegaon nashik marathi news