
मनमाडच्या दिशेने इंदूर-पुणे महामार्गावर येणाऱ्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार व दुचाकीवर कलंडला. पण देव तारी त्याला कोण मारी...कारमधील चार जण आश्चर्यकारकरीत्या बचावले.नेमकी कशी घडली घटना...
मनमाड (जि.नाशिक) : मंगळवारी (ता. १२) दुपारी मनमाडच्या दिशेने इंदूर-पुणे महामार्गावर येणाऱ्या ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार व दुचाकीवर कलंडला. पण देव तारी त्याला कोण मारी...कारमधील चार जण आश्चर्यकारकरीत्या बचावले.नेमकी कशी घडली घटना...
देव तारी त्याला कोण मारी;कारमधील चार जण आश्चर्यकारकरीत्या बचावले.
मंगळवारी (ता. १२) दुपारी मनमाडच्या दिशेने इंदूर-पुणे महामार्गावर येणारा ट्रक कॅम्प भागातील बेथेल चर्चजवळ असलेल्या गतिरोधकावर आला असता, चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कार व दुचाकीवर कलंडला. या अपघातात दुचाकीवरील रवींद्र गोडसे (रा. अनकवाडे), प्रवीण सोनावणे हे दोघे जण ट्रक खाली येत जागीच ठार झाले. कारमध्ये असलेले चार जणांनी प्रसंगावधान राखत बाजूला पळल्यामुळे बचावले. ट्रकचालक व क्लिनर जखमी झाले असून, त्यांच्यावर मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघतानंतर दुतर्फा वाहतूक ठप्प झाली होती.
हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात
दुचाकीवरील दोन जण जागीच ठार
इंदूर-पुणे महामार्गावर कॅम्प भागात बेथल चर्चसमोर ट्रक, कार व दुचाकीच्या झालेल्या विचित्र अपघतात दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले, तर ट्रकचालक व क्लिनर जखमी झाले असून, कारमधील चार जण आश्चर्यकारकरीत्या बचावले.
हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा