मजुरांना घेऊन येत असलेला टेम्पो उलटला..अन् एकच खळबळ

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

इगतपुरी येथील 31 मजूर मक्‍याच्या गोण्यांसह पांढुर्ली येथील मका व्यापारी शिवाजी वाजे यांच्याकडे कामासाठी येत होते. महामार्गावर राजस्थानी ढाब्यासमोरील वळणावर हा टेम्पो उलटला. आणि एकच खळबळ उडाली

नाशिक/ पांढुर्ली : इगतपुरी येथील 31 मजूर मक्‍याच्या गोण्यांसह पांढुर्ली येथील मका व्यापारी शिवाजी वाजे यांच्याकडे कामासाठी येत होते. महामार्गावर राजस्थानी ढाब्यासमोरील वळणावर हा टेम्पो उलटला. आणि एकच खळबळ उडाली

महामार्गावर टेम्पो उलटला आणि...

निनावी व पिंपळगाव घाडगा (ता. इगतपुरी) येथील 31 मजूर मक्‍याच्या गोण्यांसह पांढुर्ली येथील मका व्यापारी शिवाजी वाजे यांच्याकडे कामासाठी येत होते. महामार्गावर राजस्थानी ढाब्यासमोरील वळणावर हा टेम्पो उलटला. त्याखाली अडकलेल्या काही मजुरांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढले. यात अजय मोतीराम वाघ (वय 20, रा. निनावी) व श्रावण सोमा मधे (24, पिंपळगाव घाडगा) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.रविवारी (ता. 28) सकाळी साडेनऊच्या सुमारास झालेल्या या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांना नाशिकला हलविण्यात आले असून, अन्य जखमींवर धामणगाव येथील एस.एम.बी.टी. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सिन्नर पोलिसांनी टेम्पोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा > धक्कादायक! विवाहित महिलेची माहेरी गळफास घेऊन आत्महत्या...परिसरात खळबळ

 दोन मजूर ठार 

जयराम धोंडू इरनक (30) व भीमा पंढरी इरनक (35) गंभीर जखमी असल्याने त्यांना आडगाव येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. उर्वरित मजुरांवर धामणगाव येथे उपचार सुरू आहेत. हवालदार उदय पाठक, श्रीकांत गांगुरले व नवनाथ शिरोळे यांनी घटनास्थळी पाहणी व पंचनामा केला. सिन्नरच्या पालिका रुग्णालयात चिकित्सेनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्यावर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पाठक तपास करीत आहेत.

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two laborers killed by reversing tempo