लाचखोर कृषी उपसंचालकाच्या घरीच सापडली चक्क "इतकी' रोकड

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 5 March 2020

अटक करण्यात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या छाप्यामध्ये पथकाच्या हाती दोन लाख रुपयांची रोकड, दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागदागिने, डीमॅट खाते, शेअर्सची कागदपत्रे, पाच ते सहा बॅंकांचे पासबुक यासह काही स्थावर मालमत्तेची कागदपत्रे लागली आहेत.

नाशिक : द्राक्ष निर्यातीसाठी देण्यात येणाऱ्या फायटो परवान्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले कृषी उपसंचालक नरेंद्र आघाव यांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, त्यांच्या घराच्या झडतीमध्ये दोन लाखांची रोकड, दागदागिने व मालमत्तेची कागदपत्रे पथकाच्या हाती लागली आहेत. 

दागदागिने, कागदपत्रे जप्त; दोन दिवसांची पोलिस कोठडी 
जे ऍन्ड जे एक्‍स्पोर्ट कंपनीच्या तक्रारदारानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (ता. 3) नरेंद्र आघाव यांना लाच घेताना पकडले होते. बुधवारी (ता. 4) जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता गुरुवार (ता. 5)पर्यंत दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी आघाव यांना अटक करण्यात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांच्या निवासस्थानी छापा टाकला. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या छाप्यामध्ये पथकाच्या हाती दोन लाख रुपयांची रोकड, दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागदागिने, डीमॅट खाते, शेअर्सची कागदपत्रे, पाच ते सहा बॅंकांचे पासबुक यासह काही स्थावर मालमत्तेची कागदपत्रे लागली आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आघाव यांच्या मालमत्तेची चौकशी केली जाणार आहे. उपअधीक्षक सुनील पाटील तपास करीत आहेत. 

हेही वाचा > थरारक! साक्षात समोर मृत्यू उभा असताना "माऊलीला" कुठे जीवाची पर्वा होती? तिचा जीव बाळामध्येच...

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two lakh rupees was found at the home of agricultural sub-director Nashik Marathi News