मनात आईची भिती.. दोघींनी रात्र काढली बाकावर झोपून..अवघ्या दोन तासात पोलीसांची अ‍ॅक्‍शन!

सकाळ वृत्तसेवा 
शनिवार, 23 मे 2020

मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी त्या आल्या होत्या. मात्र  उशीर झाल्याने आई बोलेल म्हणून येथेच फिरत राहिल्या. वडाळा पाथर्डी रस्त्याने थेट पाथर्डी गावापर्यंत त्यांनी भटकंती केली.  रात्री मग परिसरातील एका उद्यानांमध्ये बाकावर झोपून घेतले..अन् मग घडला हा प्रकार 

नाशिक / इंदिरानगर : घाबरलेल्या अवस्थेत आलेली महिला पोलीसांना सांगत होती की, शुक्रवारी (ता. 22) ला सायंकाळी साडे सात वाजता या दोन्ही मुलींना मेडिकल स्टोअर्समध्ये डोके दुखत असल्याने गोळी आणण्यासाठी पाठवले होते. मात्र त्यानंतर त्या आल्याच नाहीत..अन् मग घडला हा प्रकार ​

असा घडला प्रकार

एक महिला घाबरलेल्या अवस्थेत पोलीसांना सांगत होती की, शुक्रवारी (ता. 22) ला सायंकाळी साडे सात वाजता या दोन्ही मुलींना मेडिकल स्टोअर्समध्ये डोके दुखत असल्याने गोळी आणण्यासाठी पाठवले होते. मात्र त्यानंतर त्या आल्याच नाहीत. रात्रभर त्यांची वाट बघितली सर्वत्र शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाहीत. त्यामुळे तक्रार दाखल करण्यासाठी आली आहे. हे सर्व ऐकत असलेल्या वरिष्ठ निरीक्षक माईनकर यांनी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील ,उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते यांना ही माहिती दिली त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. तातडीने गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सतीश जगदाळे, उपनिरीक्षक प्रवीण बाकले, पोलीस नाईक सावंत, पटेल, ठाकरे आणि राऊत यांना आवश्यक त्या सूचना देऊन तपासास सुरुवात केली.सर्वत्र माहिती देण्यात आली.

मुलींना शोधून महिलेच्या स्वाधीन

शनिवारी (ता.२३) दुपारी राजीवनगर येथील महिलेने माझ्या दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून कुणीतरी पळवून नेले आहे अशी तक्रार इंदिरानगर पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ निरीक्षक निलेश माईनकर यांनी ॲक्शन मध्ये येत अवघ्या दोन तासात या मुलींना शोधून काढत या महिलेच्या स्वाधीन केले.

हेही बघा > VIDEO : जेव्हा आर्मीचे अधिकारी करतात पोलीसांचे कौतुक...म्हणतात....व्हिडिओ होतोय व्हायरल

मुलींनी सांगितले की...

दोन तासानंतर संबंधित वर्णनाच्या मुली वडाळा पाथर्डी रस्त्यावर शरयू नगर येथे आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तेथे जात या मुलींना ताब्यात घेण्यात आले .त्यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी त्या आल्या होत्या. मात्र  उशीर झाल्याने आई बोलेल म्हणून येथेच फिरत राहिल्या. वडाळा पाथर्डी रस्त्याने थेट पाथर्डी गावापर्यंत त्यांनी भटकंती केली. रात्री मग परिसरातील एका उद्यानांमध्ये बाकावर झोपून घेतले .सकाळी पुन्हा भटकंती सुरू केली. दरम्यान या मुलींचे ,त्यांच्या आईचे आणि आजीचे समुपदेशन करून पोलिसांनी त्यांना त्यांच्या स्वाधीन केले असून पोलीस सर्वच प्रकरणाचा शहनिशा करत आहेत.

हेही वाचा > धक्कादायक.."इथं पोलीसाच्या पत्नीलाच मिळेना न्याय; तिथं तुमची आमची बात काय?" पोलिस ठाण्यात कुजबुज

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two minor missing girls found in two hours police action in nashik marathi news