धक्कादायक! पिल्लाला अंघोळ घातल्यानंतर दोघेही खाणीतून बाहेर आलेच नाही.. दृश्य बघताच ग्रामस्थांना धक्काच!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 17 June 2020

गेल्या दोन दिवसांत चांगला पाऊस झाल्याने या खाणीतील पाच ते सहा फूट खोल खड्ड्यात पाणी साचलेले आहे. घराजवळच असलेल्या या खाणीत दोघे कुत्र्याच्या पिल्लाला सोबत घेऊन अंघोळीला गेले होते. पिलाला अंघोळ घातल्यानंतर दोघेही पाण्यात उतरले ते बाहेर आलेच नाहीत. कुत्र्याचे पिल्लू एकटेच भिजून परत आल्याचे बघताच बाळू अस्वले यांनी तातडीने मुलांचा शोध सुरू केला. त्यानंतर जे काही दृश्य बघितले..ज्यामुळे ग्रामस्थांना धक्काच बसला

नाशिक / सिन्नर : गेल्या दोन दिवसांत चांगला पाऊस झाल्याने या खाणीतील पाच ते सहा फूट खोल खड्ड्यात पाणी साचलेले आहे. घराजवळच असलेल्या या खाणीत दोघे कुत्र्याच्या पिल्लाला सोबत घेऊन अंघोळीला गेले होते. पिलाला अंघोळ घातल्यानंतर दोघेही पाण्यात उतरले ते बाहेर आलेच नाहीत. त्यानंतर जे काही दृश्य बघितले..ज्यामुळे ग्रामस्थांना धक्काच बसला

अशी घडली घटना..

घराजवळच असलेल्या या खाणीत दोघे कुत्र्याच्या पिल्लाला सोबत घेऊन अंघोळीला गेले होते. पिलाला अंघोळ घातल्यानंतर दोघेही पाण्यात उतरले ते बाहेर आलेच नाहीत. कुत्र्याचे पिल्लू एकटेच भिजून परत आल्याचे बघताच बाळू अस्वले यांनी तातडीने मुलांचा शोध सुरू केला. त्या वेळी एका लहान मुलाने ते दोघे खाणीकडे गेल्याचे सांगितले. अर्ध्या तासानंतर श्री. अस्वले तेथे पोचले, त्यानंतर दोघांना पाण्यातून काढून रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. दोन्ही मुलांवर सायंकाळी गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट

पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

वडझिरे (ता. सिन्नर) येथे दगडाच्या खाणीतील खड्ड्यातील पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता. 16) दुपारी दीड ते दोनच्या सुमारास ही घटना घडली. हृषीकेश बाळू अस्वले (वय 12) व अर्णव विनोद शिंदे (10) अशी या बालकांची नावे आहेत.

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two minors death due to drowned nashik marathi news