
नाशिक : 31 डिसेंबरला रात्री कल्याण, खंबाळपाडा रोडवर, नाइन्टी फिट लॉन हॉटेलसमोर अरुण विनोद सरोज (22) याच्यावर गुप्तीने वार केल्याची माहिती पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.
असे घडले सर्व...
शहर पोलिसांनी 20 लाखांच्या दरोड्यातील तडीपारासह डोंबिवलीत हाणामारी करून फरारी असलेल्या दोघा संशयितांना शनिवारी (ता. 4) अटक केली. शहरात शनिवारी युनिट एकच्या पथकातील संदीप भुरे यांना मिळालेल्या बातमीनुसार पथकाने पेठ रोडवरील भक्तिधामसमोर अजय संतोष महापुरे (वय 22, फुलेनगर, पंचवटी) यास धारदार गुप्तीसह पकडले. पोलिस उपनिरीक्षक बलराम पालकर, विशाल काठे, स्वप्नील जुंद्रे आदींनी सापळा रचला होता.
दुसरी घटना अशी..
तडीपार अशोक स्तंभावर अटकेत दुसऱ्या घटनेत पोलिसांनी शहरातून हद्दपार केलेला जितेंद्र रवींद्र शेटे (रा. सरदार चौक, पंचवटी) याला अशोक स्तंभ परिसरात अटक केली. गुन्हे शाखा, युनिट एकचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पोपट कारवाळ, हवालदार संजय मुळक, गणेश वडजे यांच्या पथकाने अशोक स्तंभ परिसरात सापळा लावून ही कारवाई केली. शेटे सराईत गुन्हेगार असून, त्याने 25 मेस नाशिक-पुणे मार्गावरील बोधलेनगर येथील ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कॅश रिसीव्हरचे काम करणारे अक्षय कैलास बागूल (21 रा. सिडको) व त्याचा सहकारी विशाल निकुंभ असे दुकानांमधील रिसीव्ह केलेली कॅश घेऊन जाताना सिटी सेंटर मॉलसमोर असलेल्या कॅफे 24 या हॉटेलच्या बाजूस असलेल्या वृंदावन अपार्टमेंटसमोर 20 लाख 45 हजारांचा दरोडा टाकला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.