#COVID19 : सातत्याने सुचना देऊनही संचारबंदीचे उल्लंघन.. ६३ लोकांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 24 मार्च 2020

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शहरासह जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध पोलीस ठाण्यांतर्गत ज्या व्यावसायिकांकडे गर्दी होण्याची शक्यता आहे, अशा लोकांना पोलिसांकडून सातत्याने नोटिसांद्वारे गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

नाशिक : शहरात सुदैवाने अद्याप कोरोना संशयितांचे नमुने तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त होत आहेत, मात्र संशयितांची संख्याही अलीकडे वाढत असल्याने प्रशासनाची चिंताही वाढली आहे. मागील तीन दिवसांत आयुक्तालय हद्दीत ९४३ आस्थापनांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच साथरोग प्रतिबंधक व संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करणा-या एकूण २२६ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये रविवारी (ता.२२)  रात्रीची संचारबंदी मोडणा-या एकूण ६३ लोकांविरुध्द पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारींकडून प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शहरासह जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार पोलीस आयुक्तालय हद्दीत विविध पोलीस ठाण्यांतर्गत ज्या व्यावसायिकांकडे गर्दी होण्याची शक्यता आहे, अशा लोकांना पोलिसांकडून सातत्याने नोटिसांद्वारे गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

#COVID19 : जिल्हाधिकारींच्या नावाने फेक संदेश व्हायरल; सायबर सेलकडे तक्रार दाखल

गर्दीला कारणीभूत ठरणा-याव्यावसायिकांवर गुन्हे दाखल

राज्यात रविवारी (दि.२२) मध्यरात्री कलम १४४ नुसार जमावबंदी आदेशदेखील लागू केला गेला आहे. जीवनावश्यक वस्तू विक्री वगळता गर्दीला कारणीभूत ठरणा-याव्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. यामध्ये कापड दुकानदार, हॉटेलचालक, वॉइन शॉप, देशी दारू दुकाने, पानटपरीचालकांचा समावेश आहे.

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two twenty six people were charged with violating the curfew Nashik marathi News