तलावाशेजारी सेल्फी काढण्याचा नाद.. मित्रांसोबत पावसाचा आनंद बेतला दोन मित्रांच्या जीवावर...कुटुंबियांचा आक्रोश

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

सध्या पावसामुळे या भागातील निसर्गसौंदर्य खुलले असल्याने दोघे मित्र पर्यटनासाठी वायनरीच्या पाठीमागील वासाळी शिवारातील पाझर तलावाजवळ आले होते. यावेळी घडली घटना

नाशिक / सातपूर : सध्या पावसामुळे या भागातील निसर्गसौंदर्य खुलले असल्याने दोघे मित्र पर्यटनासाठी वायनरीच्या पाठीमागील वासाळी शिवारातील पाझर तलावाजवळ आले होते. यावेळी घडली घटना

काय घडले नेमके?

सध्या पावसामुळे या भागातील निसर्गसौंदर्य खुलले असल्याने अंबड खुर्द येथील महालक्ष्मीनगरमधील रहिवासी असलेले अभिषेक भगवान जयस्वाल (१८), गणेश प्रमोद भारती (१९) हे दोघे मित्र पर्यटनासाठी वायनरीच्या पाठीमागील वासाळी शिवारातील पाझर तलावाजवळ आले होते. महाविद्यालयाच्या मित्रांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा फोटो काढण्याचा नादात खोल पाण्याचा अंदाज आला नाही..यावेळी एकाचा पाझर तलावात तोल गेला तर दुस-यानेही त्यास वाचविण्यासाठी तलावात उडी घेतली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले आणि नाकातोंडात पाणी गेल्याने बुडून मृत्यूमुखी पडल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच अंबडच्या महालक्ष्मीनगरमध्ये शोककळा पसरली.पर्यटनावर बंदी कायमवर्षासहलीवर जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेरसुध्दा बंदी कायम आहे.

पोलीसांनी घेतली घटनास्थळी धाव

अभिषेक व गणेश मित्रांसोबत शनिवारी (ता. 4) दुपारी साडेतीनच्या सुमारास सुला वाइनच्या शेजारील तलावात फोटो काढण्यासाठी आले. त्यांना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. मित्रांनी आरडाओरडा करत वाचविण्यासाठी प्रयत्न केले. सातपूर पोलिसांना पाचरण करताच पोलिस उपनिरीक्षक एस. डी. चव्हाण व उपनिरीक्षक नागरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नंतर अग्निशमन दलासह सर्वच यंत्रणेला प्राचारण करण्यात आले. पाण्यातून बाहेर काढून वैद्यकीय तपासणी केली असता, दोघांचाही मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले.  

हेही वाचा > संतापजनक! "...तर गौरव आज आमच्यात असला असता.."आरोप करत नातेवाईकांनी फोडला हंबरडा..आरोग्य केंद्राची तोडफोड

प्रशासनाकडून बंदी

कोरोनामुळे लॉकडाऊनदेखील वाढविण्यात आले आहे. यामुळे शहरालगतच्या धरण, तलाव, धबधब्यांच्या परिसरात पर्यटनाला जिल्हा प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. 

हेही वाचा >प्रेरणादायी..! पत्नी खंबीर.. बेरोजगार व्यावसायिक पतीला दिली अशी साथ...संसाराचा केला स्वर्ग!​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two youths drowned in pond Nashik marathi news