ह्रदयद्रावक! काम मिळेल या आशेने भाऊ आला बहिणीकडे..नंतर झाडाला ओढणी बांधून केले भयावह कृत्य

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 20 June 2020

कोरोना संसर्गामुळे सातत्याने सुरू असलेले लॉकडाउन, जवळची जमापुंजी संपलेली, रोजगारासाठी भटकंती मात्र अपयश, घरात आर्थिक विवंचनेमुळे होणारे वाद अन्‌ रोजगार मिळेल की नाही याची शाश्‍वती नसल्याच्या नैराश्‍यातून अनेक तरुणांनी धक्कादायक कृत्य केले असल्य़ाची  माहिती समोर येतेय.

नाशिक : कोरोना संसर्गामुळे सातत्याने सुरू असलेले लॉकडाउन, जवळची जमापुंजी संपलेली, रोजगारासाठी भटकंती मात्र अपयश, घरात आर्थिक विवंचनेमुळे होणारे वाद अन्‌ रोजगार मिळेल की नाही याची शाश्‍वती नसल्याच्या नैराश्‍यातून अनेक तरुणांनी धक्कादायक कृत्य केले असल्य़ाची  माहिती समोर येतेय.

निफाड तालुक्‍यातील तरुणाने हे काय केले...
नाशिकमध्ये काम मिळेल या आशेने गावावरून शहरात बहिणीकडे आला. मात्र, शहरातही काम न मिळाल्याने तरुणाने पांडवलेण्याच्या डोंगरावर ओढणीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. विकास पागिरे (वय 28, साईपुष्प अपार्टमेंट, पाथर्डी फाटा, मू.रा. निफाड तालुका) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी पांडवलेण्याच्या डोंगरावर झाडाला फाशी घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. संबंधितांनी इंदिरानगर पोलीसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता लेण्यांच्या मागच्या बाजूला असलेल्या झाडास ओढणी बांधत गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे दिसून आले. तपासाअंती हा तरुण कामाच्या शोधासाठी नाशिक येथे बहिणीकडे आला होता. मात्र, त्याला कुठेही रोजगार न मिळाल्याने त्याने हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्‍त करण्यात आला. पोलिसांनी मृतदेह उतरवत विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविला. इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

कौटुंबिक कलहातून आयटीआय पटांगणावर तरुणाची आत्महत्या 
सातपूर  येथील कांबळेवाडीतील गौतम शंकर मगर (वय 42, व्यवसाय हातमजूर) या तरुणाचा लॉकडाउनच्या काळात गेल्या अडीच महिन्यांपासून रोजगार बंद झाला होता. परिणामी घरात मोठ्या प्रमाणावर आर्थिक चणचण निर्माण झाली होती. मुलांचे शिक्षण, पुस्तकांचा खर्च, शाळेची फी कशी द्यायची यावरून नित्याने कुटुंबात वाद होऊ लागला. मगर गुरुवारी रात्री मद्यप्राशन करून घरी आले. या वेळी त्यांचा पत्नीशी वाद झाला. मध्यरात्री ते घरातून निघून गेले. कुटुंबीयांनी अर्ध्या तासानंतर त्यांचा शोध घेण्यास सुरवात केली. मात्र, ते मिळून आले नाहीत. सकाळी आयटीआय कॉलेज पटांगणात बाभळीच्या झाडाला गळफास घेतल्याच्या अवस्थेत ते आढळून आले. सातपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पोलिस निरीक्षक राकेश हांडे व हवालदार कोटमे तपास करीत आहेत. 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण

बेरोजगारीच्या कारणातूनच मृत्यू

दोन तरुणांनी गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याच्या घटना शुक्रवारी (ता. 19) नाशिक शहरात घडल्या. आठवडाभरात मालेगावातील तीन जणांनीही बेरोजागारीच्या कारणातूनच मृत्यूला कवटाळले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two youths strangled due to unemployment depression nashik marathi news