esakal | नाशिकमध्ये येताच उदय सामंत थेट भुजबळ फार्मवर; पालकमंत्र्याची घेतली ग्रेट भेट!
sakal

बोलून बातमी शोधा

uday samant nd chhgan bhujabl.jpg

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात आज रविवार (ता. 20) राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली. 

नाशिकमध्ये येताच उदय सामंत थेट भुजबळ फार्मवर; पालकमंत्र्याची घेतली ग्रेट भेट!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांची नाशिक भुजबळ फार्म येथील कार्यालयात आज रविवार (ता. 20) राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली. 

नाशिकच्या शैक्षणिक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत नाशिक येथे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, उपकेंद्र नाशिक यांच्या परिक्षांबाबत आढावा बैठकां होत आहे. त्या अगोदर त्यांनी आज सकाळी १०.३० वाजता भुजबळ फार्म कार्यालय येथे पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली. यावेळी नाशिक येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उपकेंद्रासह नाशिकच्या शैक्षणिक प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

यावेळी नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, एमव्हीपी शिक्षण संस्थेचे संचालक सचिन पिंगळे, अशोक सावंत आदी उपस्थित होते.

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश