esakal | ह्रदयद्रावक.. २४ तास दुर्लक्ष..अन् भुकेने तडफड  कोरोनामुळे माणुसकीही हरवली..
sakal

बोलून बातमी शोधा

death body 123.jpg

रविवारीही हा व्यक्‍ती त्याच ठिकाणी पडून असल्याने स्थानिक रहिवाशांकडून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. 24 तासांपासून हा व्यक्‍ती पडून असल्यावर एकही नागरिक त्याच्याजवळ गेला नाही. दुपारपर्यंत सुरू असलेली हालचाल सायकाळी बंद झाल्याचे स्थानिकांनी सांगितले

ह्रदयद्रावक.. २४ तास दुर्लक्ष..अन् भुकेने तडफड  कोरोनामुळे माणुसकीही हरवली..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सिडको : रविवारीही हा व्यक्‍ती त्याच ठिकाणी पडून असल्याने स्थानिक रहिवाशांकडून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. 24 तासांपासून हा व्यक्‍ती पडून असल्यावर एकही नागरिक त्याच्याजवळ गेला नाही. दुपारपर्यंत सुरू असलेली हालचाल सायकाळी बंद झाल्याचे स्थानिकांनी सांगितले

अशी घडली घटना

पंडितनगर येथे शनिवारी (ता. 30) सायंकाळपासून एक तरुण व्यक्ती पडून होता. रविवारीही हा व्यक्‍ती त्याच ठिकाणी पडून असल्याने स्थानिक रहिवाशांकडून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत होते. 24 तासांपासून हा व्यक्‍ती पडून असल्यावर एकही नागरिक त्याच्याजवळ गेला नाही. दुपारपर्यंत सुरू असलेली हालचाल सायकाळी बंद झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यानंतर सिडकोतील मुकेश शेवाळे व अमित वराडे या परिसरातून जात असताना त्यांना घटनेची माहिती मिळाली. त्यांनी संबंधित व्यक्‍तीबाबत अंबड पोलिस ठाण्याला माहिती दिली. त्यानंतर संबंधित व्यक्‍तीला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु तो मृत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. मृत व्यक्तीच्या हातावर "विजय' असे नाव गोंदलेले होते. तो परभणी येथील असून, नाशिकमध्ये बिगारी काम करत असल्याची माहिती मिळाली.  

हेही वाचा > कोरोनापेक्षा बदनामीच्या विषाणूशी 'तो' वेदनादायक संघर्ष...पण, आम्ही लढलोच!

चोवीस तासांपासून बेवारस मृतदेह 

पंडितनगर परिसरात 24 तासांपासून एक व्यक्‍ती बेवारसपणे पडून होती. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कुणीही तिच्या जवळ जाण्यास धजावत नसल्याने शेवटी दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यास याबाबत माहिती कळवली. त्यानंतर वैद्यकीय पथकाने तपासणी केल्यावर संबंधित व्यक्‍ती मृत असल्याचे सांगण्यात आले. दुपारपर्यंत ही व्यक्‍ती जिवंत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

हेही वाचा > 'मी नाही, माझ्यातल्या खेळाडूने केले कोरोनाला क्लिन बोल्ड!'