काका मोबाईल टीव्हीला जोडायचा..अन् पुतणीला दाखवायचा अश्‍लील चित्रफित ...धक्कादायक!

uncle molest niece.jpg
uncle molest niece.jpg

नाशिक : सिडकोतील सिंहस्थनगरमध्ये राहणाऱ्या चुलत्याने अल्पवयीन पुतणीला अश्‍लील चित्रफित दाखवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने चुलत्याच्या नात्यालाच काळिमा फासला आहे.

असा घडला प्रकार...

पीडित अल्पवयीन मुलीच्या आईच्या फिर्यादीनुसार पीडित मुलगी ही सुटीमध्ये संशयित काकाकडे येत असे. पीडितेची काकू कामानिमित्ताने बाहेर गेली असता संशयित काका मोबाईल टीव्हीला जोडायचा आणि अश्‍लील चित्रफित पीडितेला दाखवायचा. तसेच, बळजबरीने अश्‍लील चाळे करायचा. पीडितेने वेळोवेळी संशयित काकाला विरोधही केला. तसेच याबाबत पीडितेने काकूलाही सांगितले. परंतु उलट तिनेच कोणाला काहीही सांगू नको, असे म्हणून तिला गप्प केले. संबंदित प्रकार चार वर्षांपासून सुरू होता. मात्र याबाबत तिने तिच्या आईला सांगितल्यानंतर याप्रकरणी अंबड पोलिसांत पॉक्‍सो, विनयभंग याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक निरीक्षक कोल्हे तपास करीत आहेत.  

 दुसरी घटना.... त्याने घरात घुसून दिर अन् वहिनीला मारले...

चुंचाळे शिवारात संशयिताने घरात घुसून विवाहितेचा विनयभंग करीत पीडितेच्या दीरास मारहाण केल्याची घटना घडली. सुमीत लंगोटे (रा. घरकुल योजना, चुंचाळे शिवार, अंबड) असे संशयिताचे नाव आहे. पीडित विवाहितेच्या फिर्यादीनुसार सोमवारी (ता. 17) सकाळी साडेदहाच्या सुमारास पीडित विवाहिता घरात असताना संशयित सुमीत घरात शिरला आणि विवाहितेला पाठीमागून येऊन मिठी मारली. त्यानंतर त्याने अश्‍लील चाळे करीत विवाहितेचा विनयभंग केला. तसेच पीडितेच्या दीरास शिवीगाळ करीत मारहाण केली आणि पाहून घेण्याची धमकीीराची दिली. याप्रकरणी अंबड पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक म्हात्रे तपास करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com