अज्ञात समाज कंटकाने शेतपिकावर फवारले तणनाशक; शेतकऱ्याचे मोठे नुकसान

भाऊसाहेब गोसावी
Saturday, 17 October 2020

कानमंडाळे येथील सुधाकर संतु मोरे या शेतकऱ्याच्या एक महिन्याच्या डौलदार कांदा पिकावर अज्ञात व्यक्तीने राऊंड अपसारखे तणनाशक फवारले आहे. यामुळे त्यांचे वीस गुंठ्यांत असलेले जोमदार कांद्याचे पीक उध्वस्त झाले. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नाशिक : (चांदवड) कानमंडाळे येथील सुधाकर संतु मोरे या शेतकऱ्याच्या एक महिन्याच्या डौलदार कांदा पिकावर अज्ञात व्यक्तीने राऊंड अपसारखे तणनाशक फवारले आहे. यामुळे त्यांचे वीस गुंठ्यांत असलेले जोमदार कांद्याचे पीक उध्वस्त झाले. परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

असा आहे प्रकार

रविवारी (ता. 16) सगळीकडेच कांदा अन् कांद्याच्या बाजार भावाची चर्चा आहे. अनेक शेतकऱ्यांना कांदा लागवडीसाठी रोपे मिळेनाशी झाली आहे. काही शेतकऱ्यांची लागवड झालेले कांद्याचे पीक खराब वातावरणामुळे नासले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर कांद्याचे पीक नाही. अशातच सुधाकर मोरेंच्या बाबतीत हा प्रकार घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अत्यल्प भूधारक शेतकरी असलेल्या या शेतकऱ्याच्या बाबतीत हा प्रकार घडल्याने त्यांच्या पिकावर तणनाशक फवारणी करणा-या चा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

हेही वाचा > दुर्देवी! मुसळधार पावसात घेतला झाडाचा आसरा; मात्र नियतीने केला घात

सुधाकर मोरेंना अवघी एक एकर शेती आहे. या एक एकरमध्ये त्यांनी या वर्षी कांद्याची लागवड केली आहे. या एकर पैकी वीस गुंठ्यांत औषध फवारल्याने ते हतबल झाले आहेत. कांद्याला बाजार भाव चांगला असल्याने ते या कांदा पिकाला पोटच्या पोरासारखं सांभाळत होते. त्यांच्या या नुकसानीची तात्काळ पाहणी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा > दारूची नशा भोवली : अगोदरच मद्यधुंद असूनही आणखी दारूची हौस; नशेत केले कांड, चौघे थेट तुरुंगात!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An unidentified person caused extensive damage onion crop nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: