विनाकारण घराबाहेर निघाल तर सावधान! दहीवड ग्रामपंचायतीची अनोखी शक्कल..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 एप्रिल 2020

कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. नागरिकांना घरात बसून राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक लोक विनाकारण बाहेर पडत आहेत. त्यांना कितीही समजून सांगितले, तरी ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे दहीवड ग्रामपंचायतीने अनोखी शक्कल लढविली आहे.

नाशिक / दहीवड : कोरोनाशी लढा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्थाही युद्धपातळीवर काम करीत आहेत. नागरिकांनी काहीही न करता फक्त घरात बसून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, अनेकांना याचे गांभीर्य लक्षात येत नसल्याने आता कठोर पावले उचलण्यास सुरवात झाली आहे. याचाच एक भाग म्हणून दहीवड (ता. देवळा) येथे विनाकारण घराबाहेर फिरताना आढळेल त्याची गाढवावरून धिंड काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सरपंच आदिनाथ ठाकूर व उपसरपंच मनीष ब्राह्मणकर यांनी दिली. 

दहीवड ग्रामपंचायतीची अनोखी शक्कल
कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढतच आहे. नागरिकांना घरात बसून राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, ग्रामीण भागातील अनेक लोक विनाकारण बाहेर पडत आहेत. त्यांना कितीही समजून सांगितले, तरी ऐकायला तयार नाहीत. त्यामुळे दहीवड ग्रामपंचायतीने अनोखी शक्कल लढविली आहे. जी कोणी व्यक्ती विनाकारण बाहेर पडेल तिची गाढवावरून धिंड काढण्यात येणार असल्याची सूचना गावातील प्रदर्शनी भागातील फलकावर लिहिली आहे. बाहेर फिरणाऱ्या व्यक्तीचा फोटो ग्रामपंचायतीस सादर करणाऱ्यास योग्य ते बक्षीस देण्यात येणार असल्याचेही फलकावर लिहिले आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! दाम्पत्य दिवसभर घरातच बसायचे अन् रात्री घराबाहेर फिरायचे...कस्तुरबा रुग्णालयातील नर्सचे इगतपुरी कनेक्‍शन..

हेही वाचा > लॉकडाउन दरम्यान पहाटे संशयास्पद कंटेनरला पोलीसांनी अडवला...झडती घेतली तेव्हा धक्काच!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: unique idea from Dahiwad Gram Panchayat for who doesnt follow rules