धक्कादायक! जाकिर नाईकची माहिती आरोग्य विद्यापीठाच्‍या संकेतस्‍थळावर नाहीच, तर भलत्याच संकेतस्‍थळावर

अरुण मलाणी
Friday, 30 October 2020

महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या अधिकृत संकेतस्‍थळावर जाकिर नाईक याबाबतची माहिती कोणत्‍याही संदर्भात उपलब्‍ध नाही. मात्र अशी माहिती दुसऱ्या संकेतस्‍थळावर असल्‍याचे निदर्शनात येत आहे.

नाशिक : महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या अधिकृत संकेतस्‍थळावर जाकिर नाईक याबाबतची माहिती कोणत्‍याही संदर्भात उपलब्‍ध नाही. मात्र अशी माहिती दुसऱ्या संकेतस्‍थळावर असल्‍याचे निदर्शनात येत आहे. संबंधित संकेतस्‍थळ तातडीने बंद करावे, अशी तक्रार विद्यापीठातर्फे सायबर सेलकडे करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र आरोग्‍य विद्यापीठाची सायबर सेलकडे धाव 
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संकेतस्थळावर यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये जाकिर नाईक यांचे नाव असल्याबाबत, हे नाव संकेतस्थळावरून तत्काळ हटविण्याची मागणी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याचे वृत्त विविध प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध झाले होते. याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे माहिती उपलब्‍ध करून दिली आहे. यात नमूद केले आहे, की अशा प्रकारची जाकिर नाईकबाबत कोणतीही माहिती महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नाही.

हेही वाचा > दुर्दैवी! शेतातील ती भातकापणी ठरली शेवटची; तरुण शेतकरीच्या बातमीने गाव हळहळले

हे संकेतस्थळ तातडीने बंद करा

विद्यापीठातर्फे इंटनेरटवर अशा प्रकारची माहिती इतरत्र कोणत्या संकेतस्थळावर असल्याचा शोध घेतला असता c96a0cl.givery.club या संकेतस्थळावर याबाबतची माहिती प्रसिद्ध असून, हे संकेतस्थळ तातडीने बंद करण्याबाबत विद्यापीठाकडून सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे.  

हेही वाचा > भररस्त्यात थरार! गळ्याला लावली तलवार आणि घेतले पाच लाख; नागरिकांत दहशत

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: university Complaint about Zakir Naik's information nashik marathi news