आरोग्य विद्यापीठाकडून उन्हाळी परीक्षांच्या अर्जांसाठी मुदतवाढ!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 मार्च 2020

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमां च्या उन्हाळी 2020 परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभुमीवर विद्यापीठाने अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे. त्यानुसार 4 एप्रिलपर्यंत नियमित शुल्कासह तर, 10 एप्रिलपर्यंत विलंब शुल्क व 16 एप्रिलपर्यंत अतिरिक्‍त विलंब शुल्कासह अर्ज सादर करता येईल. 

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमां च्या उन्हाळी 2020 परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभुमीवर विद्यापीठाने अर्ज भरण्याची मुदत वाढवली आहे. त्यानुसार 4 एप्रिलपर्यंत नियमित शुल्कासह तर, 10 एप्रिलपर्यंत विलंब शुल्क व 16 एप्रिलपर्यंत अतिरिक्‍त विलंब शुल्कासह अर्ज सादर करता येईल. 

परीक्षा अर्ज स्वहस्ते न पाठवता स्पीड पोस्टाने पाठविण्याच्या सूचना

महाविद्यालयास प्राप्त परीक्षा अर्ज विद्यापीठाकडे स्वहस्ते न पाठवता स्पीड पोस्टाने पाठविण्याच्या सूचनादेखील विद्यापीठाने दिल्या आहेत. येत्या 2 ते 20 जून या कालावधीत या परीक्षा होणार आहेत. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार मार्च अखेरपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगण्यात आले होते. परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया चार टप्यांमध्ये पार पाडली जाते आहे. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम व प्रथम वर्ष एमबीबीएस (2019) वगळून अन्य पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

महाविद्यालयांनी ई-मेलद्वारे पाठविण्याची मुदत अनुक्रमे 7, 13 व 17 एप्रिल

कोरोना विषाणूचा संभाव्य प्रादूर्भावामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेता या परीक्षेसाठी महाविद्यालयात अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार नियमित शुल्कासह परीक्षा अर्ज महाविद्यालयांकडे सादर करण्याची मुदत 4 एप्रिलपर्यंत असेल. विलंब शुल्कासह 10 एप्रिलपर्यंत व अतिरिक्‍त विलंब शुल्कासह 17 एप्रिलपर्यंत अर्ज सादर करता येतील. प्राप्त अर्जांची माहिती विद्यापीठाला महाविद्यालयांनी ई-मेलद्वारे पाठविण्याची मुदत अनुक्रमे 7 एप्रिल, 13 एप्रिल व 17 एप्रिल अशी असेल. 

हेही वाचा > पान खाल्ल्यानंतर जिभेवर चुना लावून द्राक्षबागेचा व्यवहार करत 'त्याने' शेतकऱ्यांनाच लावला चुना!

महाविद्यालय प्रतिनिधींचा प्रवास टाळला

प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज महाविद्यालयात जमा केल्यानंतर महाविद्यालय प्रतिनिधींनी विद्यापीठात स्वहस्ते परीक्षा अर्ज जमा करण्यास मज्जाव केला आहे. त्याऐवजी सर्व धनाकर्षासह विद्यापीठात जमा करण्याच्या दिनांकास भारतीय डाक कार्यालयाच्या स्पीड पोस्टद्वारे पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत.  

हेही वाचा > COVID-19 : नेपाळवरुन यात्रा करुन परतलेल्या 'त्या' 14 प्रवाशांची तपासणी; 14 दिवस असणार देखरेखीखाली

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University of Health has extended the exam application deadline nashik marathi news