आरोग्य विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना असेल 'ही'  मुभा...वाचा सविस्तर 

सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 14 जुलै 2020

कोविड-१९ च्या अपवादात्मक परिस्थितीत विशेष बाब म्हणून पदवीपूर्व विद्यार्थी हे त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाजवळचे, त्यांच्या अभ्यासक्रमाचे महाविद्यालय किंवा सद्यःस्थितीत प्रवेशित महाविद्यालय परीक्षा केंद्र म्हणून निवडू शकतात. निवड केलेल्या परीक्षा केंद्रातूनच विद्यार्थ्यांना लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागेल. सर्व पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी लांबचा प्रवास टाळण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आता उन्हाळी सत्रातील परीक्षेसाठी वास्तव्याच्या ठिकाणापासून जवळचे केंद्र निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. परीक्षा केंद्राबाबत माहिती कळविण्याची मंगळवार (ता. १४) पर्यंत मुदत आहे. दरम्यान, विद्यापीठाने कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर संलग्नित महाविद्यालयांतील सर्व पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी व परीक्षार्थींना कोविड सुरक्षा कवच योजना लागू केली आहे. विद्यापीठाची व्यवस्थापन परिषद व परीक्षा मंडळाने या योजनेस मंजुरी दिली आहे. 

आज अंतिम मुदत : कोविड सुरक्षा कवच योजना लागू 
याबाबत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक म्हणाले, की कोविड-१९ च्या अपवादात्मक परिस्थितीत विशेष बाब म्हणून पदवीपूर्व विद्यार्थी हे त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाजवळचे, त्यांच्या अभ्यासक्रमाचे महाविद्यालय किंवा सद्यःस्थितीत प्रवेशित महाविद्यालय परीक्षा केंद्र म्हणून निवडू शकतात. निवड केलेल्या परीक्षा केंद्रातूनच विद्यार्थ्यांना लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी उपस्थित राहावे लागेल. सर्व पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांनी लांबचा प्रवास टाळण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी घराजवळील त्यांच्या विद्याशाखेच्या महाविद्यालयाचा परीक्षा केंद्र म्हणून पसंतीक्रम द्यावा. तो संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांमार्फत विद्यापीठास मंगळवारपर्यंत पाठवावा. यासंबंधीचे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा > नाशिक दत्तक घेणारे कुठे गेले?...शिवसेनेचा सवाल

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन
विद्यापीठाकडून कोविड-१९ च्या पार्श्‍वभूमीवर संलग्नित महाविद्यालयांतील सर्व पदवीपूर्व, पदव्युत्तर विद्यार्थी व परीक्षार्थींना कोविड सुरक्षा कवच योजना लागू केली आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यास आजारपणात उपचारासाठी एक लाख, दुर्दैवी मृत्यू झाल्यास तीन लाखांची रक्कम प्रदान केली जाईल. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना कोविड-१९ करिता शासनाने निर्देशित केलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.  

हेही वाचा > रात्रीची वेळ..भयानक अंधार..शिक्षक चेकपोस्टवर ड्युटीवर असतानाच निघाला ६ फुटी कोब्रा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University of Health Permission to select nearest examination center nashik marathi news