
नाशिक : एखादा सर्वसामान्य व्यक्ती असो किंवा कॉर्पोरेट कंपनी, प्रत्येक व्यक्तीस आजच्या काळात कायदेशीर मार्गदर्शन, सहाय्यतेची आवश्यकता भासू लागली आहे. यातून विधी शाखेतील शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. केवळ वकिलीपुरता या क्षेत्रातील करिअरच्या पर्यायांची व्याप्ती मर्यादित नसून, सरकारी तसेच खासगी क्षेत्रात विविध स्तरांवर, विविध पदांवर उत्तम करिअर घडविता येऊ शकते. पदवी अभ्यासक्रमासोबत पदविका, सर्टिफिकेट कोर्सेस उपलब्ध आहेत.
विशेष सरकारी वकील होण्याची संधीदेखील उपलब्ध
विधी शिक्षण म्हटल्यावर दोन प्रमुख पदवी अभ्यासक्रम डोळ्यांसमोर येतात. इयत्ता बारावीनंतर पाच वर्षे कालावधीचा बी.ए.एलएलबी अभ्यासक्रम आणि कुठल्याही शाखेतील पदवी शिक्षण घेतल्यानंतर तीन वर्षे कालावधीचा एलएलबी अभ्यासक्रम हे विधी शाखेतील प्रमुख अभ्यासक्रम आहेत. याशिवाय विधी शाखेत अध्ययनात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एलएलएम या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाचा पर्याय खुला असतो. अशा उमेदवारांना नेट, सेट किंवा पीएच.डी. करत अध्ययन क्षेत्रातील दालन खुले होतात. विधी शाखेतील पदवी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना वकील व्यावसायिकांकडे सहाय्यक वकील म्हणून नोकरीचा पर्याय, स्वतःचा वकिली व्यवसाय करण्याचा पर्याय उपलब्ध असतो. याशिवाय विशिष्ट पात्रता मिळवत सरकारी वकील, विशेष सरकारी वकील होण्याची संधीदेखील उपलब्ध आहे.
कुठल्याही व्यक्तीस डिप्लोमाच्या शिक्षणाची संधी
डिप्लोमा इन इंटेलेक्चुयल प्रॉपर्टी राइट लॉज, डिप्लोमा इन लेबर लॉज ॲन्ड लेबर वेलफेअर, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉज डिप्लोमा कोर्स इन आल्टर्नेटिव डिस्प्यूट रेजल्यूशन सिस्टम, डिप्लोमा इन कंझ्युमर प्रोटेक्शन लॉज, डिप्लोमा इन सायबर लॉज, डिप्लोमा इन ह्यूमन राइट्स, डिप्लोमा इन इंटेलेक्चुयल प्रॉपर्टी राइट लॉज, डिप्लोमा इन लेबर लॉज ॲन्ड लेबर वेलफेअर, डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉज असे डिप्लोमा शिक्षणाचे पर्याय उपलब्ध आहेत. संबंधित शाखेतून ज्ञान प्राप्त करू इच्छिणारी कुठलीही पदवी शिक्षण घेतलेली व्यक्ती डिप्लोमा अभ्यासक्रम प्रवेशास पात्र ठरते. सर्टिफिकेट कोर्स इन फोरेन्सिक ॲन्ड मेडिकल जूरिसप्रूडन्स, ह्युमन राइट्स, सायबर सिक्युरिटी, ॲग्रिकल्चर लॉ अशा विविध विषयांतून प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या संधी आहेत.
सैन्यदल, आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी
विधी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना सैन्यदलात करिअरच्या संधी उपलब्ध आहेत. जॅग (जॅग एन्ट्री)अंतर्गत पात्र विद्यार्थी थेट मुलाखत प्रक्रियेत सहभागी होत सैन्यदलात दाखल होऊ शकतात. यूपीएससी, एमपीएससीच्या माध्यमातून शासकीय सेवेतील संधी आहेत. जेएमएफसीद्वारे ज्ञानदानाच्या प्रक्रियेत सहभागी होता येते. आंतरराष्ट्रीय न्यायालयात, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सल्लागार, लीगल ऑफिसर म्हणून करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.
विधी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना वकिली क्षेत्रासोबत करिअरचे व्यापक क्षितिज उपलब्ध आहे. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांमध्ये सल्लागार, कायदे अधिकारी म्हणून कामाच्या संधी आहेत. एलपीओ या नव्याने उपलब्ध पर्यायात बहुराष्ट्रीय कंपन्यांकरिता काम करत चांगले उत्पन्न मिळविता येऊ शकते. बौद्धिक संपदा (इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राइट)च्या विषयातही करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी विचार केला पाहिजे. - प्राचार्य डॉ. एस. एन. कुलकर्णी, मविप्र संस्थेचे विधी महाविद्यालय
संपादन - किशोरी वाघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.