बातमी तुमच्यासाठी : नाशिकमध्ये लॉकडाऊन दरम्यान सुरु राहणार 'हे' भाजीमार्केट!

bhaji market.jpg
bhaji market.jpg

नाशिक : देशभरात लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली असली तरी त्यातून भाजी, किराणा व मेडीकल या अत्यावशक्‍य सेवा वगळण्यात आल्या आहेत. शहरातील भाजी बाजार सुरु राहणार आहे. परंतु त्यासाठी ठराविक म्हणजे किमान सहा फुट अंतर प्रत्येक व्यक्तीमध्ये असणे गरजेचे असल्याने तशा प्रकारचे मार्किंग करण्याच्या सुचना महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आज सकाळी अधिकायांच्या बैठकीत दिल्या. 

सकाळी आठ ते दुपारी बारा व संध्याकाळी पाच ते आठ या भाजी बाजारासाठी वेळा निश्‍चित करण्यात आल्याचे सोशल मिडीयावरून सांगितले जात होते. परंतु भाजी बाजाराच्या वेळेसंदर्भात कुठल्याही सुचना नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

शहरातील अधिकृत भाजी बाजार असे 
- पुर्व विभाग- साईनाथ नगर चौफुली परिसर, कला नगर, फुले मार्केट परिसर, उपनगर जॉगिंग ट्रॅक जवळ, गांधीनगर, द्वारका परिसर, आझाद चौक परिसर. 

- पश्‍चिम विभाग- वावरे पटांगण (भद्रकाली), आकाशवाणी टॉवर (गंगापूर रोड), शरणपुर भाजी मार्केट, रोकडोबा पटांगण, यशवंत मंडई (रविवार कारंजा). 

- पंचवटी विभाग- आरटीओ कॉर्नर, बोरगड, गंगाघाट परिसर, पेठरोड परिसर, लाटे नगर (हिरावाडी), कोणार्क नगर, निलगिरी बाग, जत्रा हॉटेल समोर (औरंगाबाद रोड), दिंडोरी रोड (महालक्ष्मी टॉकीज जवळ), म्हसरुळ (दिंडोरी रोड). 

- नाशिकरोड विभाग- सायट्रीक कंपनी समोर (पंचक), मंगलमुर्ती नगर, कॅनॉल रोड, जेतवन नगर, म्हसोबा मंदीर मागे (बिग बाजार), भालेराव मळा, सोमानी गार्डन, दुर्गा उद्यान जवळ, क्रांती चौक, सिन्नर फाटा, देवळाली गाव आठवडे बाजार, मकरंद कॉलनी (उपनगर). 

- सातपूर विभाग- शिवाजी मंडई, छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजी मार्केट, विश्‍वास नगर भाजी मार्केट, गंगापूर गाव भाजी मार्केट. 

- सिडको विभाग- शिवाजी चौक, गामणे मळा, धनलक्ष्मी शाळे समोर, उपेंद्र नगर, त्रिमुर्ती चौक. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com