सावधान! मालेगावकरांनो आपली वाहने सांभाळा; शहरात वाहनचोरांचा धुमाकूळ

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 15 October 2020

शहर व तालुक्यात गेल्या तीन दिवसांत वाहन चोरीच्या चार घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या वाहनांमध्ये अडीच लाखाची पिक-अप, दोन दुचाकी व बैलगाडी अशी सुमारे तीन लाखांची वाहने चोरीला गेली आहेत. 

नाशिक : (मालेगाव) शहर व तालुक्यात गेल्या तीन दिवसांत वाहन चोरीच्या चार घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या वाहनांमध्ये अडीच लाखाची पिक-अप, दोन दुचाकी व बैलगाडी अशी सुमारे तीन लाखांची वाहने चोरीला गेली आहेत. 

शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच 

शहरातील देवीचा मळा भागातील ८० फुटी रस्त्यावर उभी असलेली अस्लम शेख निजाम (वय ३३, रा. देवीचा मळा) यांच्या मालकीची सुमारे अडीच लाख किमतीची पिक-अप गाडी (एमएच ९४, ईवाय २०४६) चोरट्यांनी लंपास केली. ९ ऑक्टोबरला पहाटे हा प्रकार घडला. पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. येथील साठफुटी रस्त्यावरील रुक्मिणी रेसिडेन्सीमधून हितेश दत्ताजी (वय ५२) यांच्या मालकीची दुचाकी (एमएच ४१, डब्ल्यू ५०९६) चोरट्यांनी चोरून नेली. छावणी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा > विकृत नातवाची करामत! आजोबांना संपवून रडण्याचे केले ढोंग; अखेर पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मालेगाव-सटाणा रस्त्यावरील गिरणा कारखाना फाट्याजवळ पप्पू अहिरे (वय २७, रा. रोकडोबानगर, दाभाडी) या मेंढपाळाच्या मालकीची सुमारे नऊ हजार रुपये किमतीची लोखंडी बैलगाडी चोरट्यांनी लंपास केली. कॅम्प भागातील श्रीराम प्लाझामधून प्रदीप कासार यांच्या मालकीची दुचाकी (एमएच ४१, पी ४२१८) चोरीला गेली. श्री. कासार यांच्या तक्रारीवरून कॅम्प पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही वाचा > हाउज द जोश! वयाच्या ऐंशीव्या वर्षीही वृत्तपत्र विक्री करणारे मधुकर कोष्टी; ६८ वर्षांपासून सेवा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vehicle theft session continues in Malegaon city nashik marathi news