तज्ञ डॉक्टर नसल्याने लासलगाव कोविड सेंटरमध्ये व्हेंटिलेटर धूळखात

अरुण खंगाळ
Wednesday, 7 October 2020

कोरोना बधितांवर सक्षम उपचार करून मृत्यूच्या दारातून बाहेर काढण्यासाठी आरोग्य प्रशासन रात्रंदिवस झटत आहे निफाड तालुक्यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून तीन हजार रुग्णांचा टप्पा पार केला आहे.

नाशिक/लासलगाव :  कोरोना बधितांवर सक्षम उपचार करून मृत्यूच्या दारातून बाहेर काढण्यासाठी आरोग्य प्रशासन रात्रंदिवस झटत आहे निफाड तालुक्यात कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून तीन हजार रुग्णांचा टप्पा पार केला आहे. गंभीर रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता असून खाजगी रुग्णालयात गोरगरीब रुग्णांना उपचार घेणे अश्यक्य असल्याने शासकीय रुग्णालयात उपचार मिळावे यासाठी राज्यानंतर केंद्र शासनाकडून लासलगाव कोविड सेंटरला देण्यात आलेले सात व्हेंटिलेटर फिजिशन तज्ञ नसल्याने धूळखात पडून आहेत.

व्हेंटिलेटर बंद खोलीत धूळखात पडून

देशासह विदेशात कोरोनाचे थैमान सुरू असून नाशिकनंतर निफाड तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलाय. निफाड तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत आहे कोरोना बधितांना वेळेत व्हेंटिलेटर न मिळू शकल्याने आपला जीव देखील गमवावा लागत आहे. राज्य शासनाकडून चार व्हेंटिलेटर देण्यात आले होते. मात्र फिजिशियन तज्ञ नसल्याचे कारण देत चारीही व्हेंटिलेटर पिंपळगाव येथील नव्याने सुरू झालेल्या शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले. यानंतर लासलगावकरांनी संताप व्यक्त केल्याने केंद्र सरकारकडून सात व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले. पण फिजिशियन तज्ञ नसल्याने हे सातही व्हेंटिलेटर बंद खोलीत धूळखात पडून आहेत. त्वरित फिजिशियन तज्ञ उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीचेेेे नाशिक जिल्हा कोषाध्यक्ष प्रकाश दायमा यांनी दिला. 

हेही वाचा > चेष्टामस्करीने गेला तरुणाचा जीव! काँप्रेसरने भरली गुदद्वारात हवा; नऊ दिवसांनंतर घटनेचा खुलासा

गेल्या सहा महिन्यात पूर्वी मार्चमध्ये लासलगाव येथे कोविड सेंटर कार्यन्वित करण्यात आले असून चारशेहून अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. यातील 60 रुग्णांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले होते याची दखल घेऊन शासनाकडून सात व्हेंटिलेटर देण्यात आले मात्र फिजिशियन तज्ञ नसल्याने अद्याप व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यात जरी आले नसले तरी फिजिशियन तज्ञ मिळावे यासाठी आरोग्य विभाग व शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असून लवकरच उपलब्ध होतील आणि व्हेंटिलेटर कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ सतीश सूर्यवंशी यांनी सांगितले 

हेही वाचा >  भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ventilator remain unused in asalgaon covid centre nashik marathi news