तोरगंण घाटात बसचे ब्रेकफेल...बसमध्ये २३ विद्यार्थी अन् समोर तीस फूट खोल दरी

सकाळ वृत्तसेवा 
रविवार, 22 मार्च 2020

वैजापूर आगाराची बस (एमएच 40, एन 9625) 23 विद्यार्थ्यांना घेऊन शनिवारी सकाळी डहाणू येथे जात होती. तोरगंण घाटातून जात असताना बसचे ब्रेक न लागल्याने अंदाजे तीस मीटर खाली दरीत बस कोसळली. यात

नाशिक / अंबोली : वैजापूर आगाराची बस विद्यार्थ्यांना डहाणू येथे घेऊन जात असताना ब्रेक फेल झाल्याने शनिवारी (ता. 21) सकाळी पावणेअकराला तोरंगण घाटात तीस फूट खोल दरीत कोसळली. यात विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. त्र्यंबकेश्‍वर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर विद्यार्थ्यांना डहाणू येथे रवाना करण्यात आले. 

किरकोळ दुखापत; प्राथमिक उपचारानंतर डहाणूला 
वैजापूर आगाराची बस (एमएच 40, एन 9625) 23 विद्यार्थ्यांना घेऊन शनिवारी सकाळी डहाणू येथे जात होती. तोरगंण घाटातून जात असताना बसचे ब्रेक न लागल्याने अंदाजे तीस मीटर खाली दरीत बस कोसळली. यात विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. अपघाताची माहिती समजताच त्र्यंबक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. जखमी विद्यार्थ्यांना त्वरित त्र्यंबकेश्‍वर ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. उपचारानंतर विद्यार्थ्यांना डहाणू येथे पाठविण्यात आले. दरम्यान, सायंकाळपर्यंत बस वरती काढण्याचे काम सुरू होते.  

हेही वाचा > COVID-19 : photos : 'त्याच्या' हातावरचा 'क्वारंटाइन' बघून प्रवाशांना भरली धडकी!...झटक्यात बस झाली रिकामी

 

हेही वाचा > COVID-19 : दुबईहून आलेल्या 'त्या' दोन क्वारंटाइन यांना इगतपुरी रेल्वे स्टेशनवर उतरवले!

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijayapur students' bus breaks fail in Taurangan Ghat Nashik Marathi News