विकास दुबे प्रकरण : नाशिक पोलिस सतर्क...भंगार व्यावसायिकांसह कंपनी ठेकेदार रडारवर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 9 July 2020

संशयित विकास दुबेची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच पोलिस सतर्कतेने कामाला लागली. सातपूर-अंबड लिंक रोड, वडाळा परिसर तसेच जिल्हाभरातील औद्योगिक वसाहतीमधील कामगार ठेकेदारांची चौकशी सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते.

नाशिक / सातपूर : उत्तर प्रदेशात आठ पोलिसांच्या हत्याप्रकरणी फरारी संशयित विकास दुबेच्या नाशिक कनेक्शनची बातमी ‘सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर नाशिक पोलिस सतर्क झाले आहेत. सातपूर-अंबड लिंक रोडसह औद्योगिक वसाहतीमधील भंगार व्यावसायिक तसेच कामगार, ठेकेदार नाशिक पोलिसांच्या रडारवर आले असून, बुधवारी (ता. ८) दिवसभर पोलिस गुप्त चौकशी करत होते. 

परप्रांतीय गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विशेष मोहीम
संशयित विकास दुबेची बातमी ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच पोलिस सतर्कतेने कामाला लागली. सातपूर-अंबड लिंक रोड, वडाळा परिसर तसेच जिल्हाभरातील औद्योगिक वसाहतीमधील कामगार ठेकेदारांची चौकशी सुरू केल्याचे सूत्रांकडून समजते. काही वर्षाच्या परप्रांतीय गुन्हेगारांबाबतही माहिती गोळा करण्याचे काम या निमित्ताने पाहायला मिळत आहे. पोलिस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी विशेष पथक तयार करून परप्रांतीय गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते. 

हेही वाचा > पहाटेची वेळ...जुना वाडा कोसळतो तेव्हा.. अंगावर काटा आणणारी दुर्घटना..!

गुन्हेगारांचे पलायन? 
विकास दुबेचे ‘नाशिक कनेक्शन’ची बातमी येताच नाशिक पोलिसांच्या धाकाने केवळ परप्रांतीय गुन्हेगारच नव्हे, तर स्थानिक गुन्हेगारही शहरातून पलायन केल्याची चर्चा रंगू लागली आहे.  

हेही वाचा >  "जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikas Dubey case Nashik police alert marathi news