"अहो दादा..आमच्या गावात पोलीस पाटीलच न्हाय.." वाचा सविस्तर

police nashik.jpg
police nashik.jpg

नाशिक / कळवण : जिल्ह्यातील एक हजार 931 पैकी 363 गावांतील पोलिसपाटलांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कोरोनाविरोधातील उपाययोजनेत अडचणी येत आहेत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून गावागावांमध्ये येणाऱ्यांना होम क्वारंटाइन करण्यासाठी व त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी महसूल, पोलिसांपेक्षा पोलिसपाटीलच महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कोरोनाविरोधी लढ्याबरोबरच तंटामुक्ती गाव मोहिमेतही पोलिसपाटलांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. त्यामुळे जिल्ह्यातील पोलिसपाटलांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात, अशी मागणी होत आहे. 

तालुकानिहाय पोलिसपाटलांच्या रिक्त जागा 
नाशिक- 17, कळवण- 38 , देवळा- 13 , सटाणा- 35, मालेगाव- 10, चांदवड- 20, नांदगाव- 26, निफाड- 28, सिन्नर- 34, इगतपुरी- 36, त्र्यंबकेश्‍वर- 18, पेठ- 25, दिंडोरी- 26, सुरगाणा- 27, येवला- 12. 


कोरोनाविरोधी लढ्यात पोलिसपाटलांची महत्त्वाची भूमिका असली, तरी सध्या लॉकडाउनमुळे ही पदे भरणे शक्‍य नाही. शासन आदेश आल्यानंतर तत्काळ पदे भरली जातील. -बी. ए. कापसे, तहसीलदार, कळवण 

कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसपाटलांनी चांगले काम केले आहे. शासनाने त्याची कुठलीही दखल घेतलेली नाही. आरोग्य, पोलिस व इतर कर्मचाऱ्यांना आरोग्य किट, प्रोत्साहन भत्ता दिला. मात्र, 24 तास काम करणाऱ्या पोलिसपाटलांना कोणताच लाभ दिला नाही. -चिंतामण मोरे, जिल्हाध्यक्ष, पोलिसपाटील संघटना 

हेही वाचा > मरणानंतरही मिळेना मोक्ष... हजारो अस्थीकलश झाडालाच लटकलेल्या अवस्थेत ..कारण वाचून व्हाल थक्क 

पोलिसपाटीलही कोविड योद्धा बनले आहेत. असे असताना तीन महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. लॉकडाउनच्या काळात शासनाने लक्ष घालून शासनाने तत्काळ मानधन द्यावे. -सोमनाथ मुळाणे, पोलिसपाटील, खतवड (ता. दिंडोरी) 

हेही वाचा > "पैसे नाही दिले..तर अंगावर थुंकून कोरोनाबाधित करेन..."अजब धमकीने त्याच्या पायाखालची सरकली जमीन!
 
प्रशासनाच्या दृष्टीने पोलिसपाटील गावातील महत्त्वाचा दुवा असून, कोरोना संकटाच्या काळात गावासोबत स्वतःची काळजी घेत गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी शासनाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहे. सर्व पोलिसपाटलांना शासनाने कोरोना आरोग्य विमाकवच द्यावे. - प्राजक्ता देवरे, पोलिसपाटील, आसोली (ता. कळवण) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com