हॉटेलमधून सर्रासपणे निघत होता हुक्क्याचा धूर... हॉटेल व्यावसायिकाचा धक्कादायक कारनामा!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 जुलै 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात संचारबंदी, जमावबंदीचे आदेश लागू आहेत. तसेच हॉटेलचालकांनी विविध नियमांचे पालन करत खबरदारी घेत व्यवसाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र याबाबत सर्रासपणे दुर्लक्ष करत काही हॉटेल व्यावसायिकांकडून व्यवसाय चालविला जात होता. वाचा धक्कादायक कारनामा

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यात संचारबंदी, जमावबंदीचे आदेश लागू आहेत. तसेच हॉटेलचालकांनी विविध नियमांचे पालन करत खबरदारी घेत व्यवसाय करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; मात्र याबाबत सर्रासपणे दुर्लक्ष करत काही हॉटेल व्यावसायिकांकडून व्यवसाय चालविला जात होता. वाचा धक्कादायक कारनामा

काय घडले नेमके?

शहराच्या वेशीलगत असलेल्या गोवर्धन व चांदशी गावांच्या शिवारात काही हॉटेलमध्ये सर्रासपणे नियमांना डावलून व्यवसाय केला जात होता, गोवर्धन गावाच्या शिवारात असलेल्या हॉटेल डायोनिजमध्ये तर चक्क हुक्क्याचा धूर उडविला जात असल्याने त्याची खबर थेट पोलिसांपर्यंत पोहचली आणि तालुका पोलीस ठाण्याचे उपनिरिक्षक शिवाजी जाधव यांच्या पथक त्या ठिकाणी पोहचले. यावेळी या हॉटेलमधून हुक्का तंबाखू, हुक्का ओढण्याचे साहित्य असा सुमारे ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. तर चांदशी शिवारातील हॉटेलमध्ये कोरोना संबंधित कुठलीही खबरदारी घेतली जात नव्हती. उपनिरीक्षक जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हॉटेल चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या भागात धाडसत्र राबवित गुन्हे दाखल करत काही संशयितांवर थेट कारवाई करत अटकही केली. 

हेही वाचा > खून झालेल्या युवकावर बलात्काराचा गुन्हा..? युवती गर्भवती राहिल्याने झाला खुलासा

पोलीसांचे धाडसत्र

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने घालून दिलेले नियम-अटींचे पालनही होत नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी हॉटेलमालक शिवराज वावरेविरूध्द गुन्हा दाखल केला. त्याचप्रमाणे रानमळा भागातील एका हॉटेलचे मालक संजय सुगंधी यांच्यावरही नियमांचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला गेला. चांदशीमधील एका हॉटेलचे मालक जितेंद्र उपाध्याय यांच्याकडूनही नियमांचा भंग झाल्याने कारवाई करण्यात आली. तसेच चांदशी शिवारातील काही हॉटेल्सचालकांनी नियम धाब्यावर बसविल्याने त्यांच्यावरही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. 

हेही वाचा > ‘आम्ही पोलिस आहोत’ असा विश्वास दाखवला..अन् निवृत्त एसटी कर्मचाऱ्यासोबत केले असे..

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violation of lockdown rules in hotels nashik marathi news