फक्त सहाच वृक्षांवर पक्ष्यांचा अधिवास? वृक्षतोड करताना वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन! 

Violation of Wildlife Conservation Act
Violation of Wildlife Conservation Act

नाशिक/चांदवड : चांदवड-मनमाड वृक्षतोड प्रकरणात धक्कादायक माहिती उघड झाली असून, रस्ता विस्तारीकरणात अडथळा ठरणाऱ्या ४८२ पैकी फक्त सहाच झाडांवर पक्ष्यांचा अधिवास असल्याचे वन विभागाने सांगितले. ही सर्व सहा झाडे चांदवड नगर परिषदेच्या हद्दीत आहेत. मात्र २३ किलोमीटरच्या हद्दीत फक्त सहाच झाडांवर पक्ष्यांची घरटी किंवा अधिवास असल्याची माहिती न पटणारी आहे. 

चांदवड-मनमाड रस्त्याला समांतर १५ किलोमीटरची डोंगररांग आहे. त्यामुळे या परिसरात अनेकदा शेतकऱ्यांना वन्यजीव आढळून येतात. रस्त्याने सायंकाळचा प्रवास म्हटला, की आकाशाला कवेत घेणारे पक्ष्यांचे अनेक थवे घरट्याकडे प्रवास करताना दिसायची. हे दृश्य जितकं मनमोहक तितकंच या रस्त्यालगत असणाऱ्या वृक्षांवर पक्ष्यांच्या असणाऱ्या अधिवासाबाबत खात्री देणार होतं. मात्र रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या याच वृक्षांची तोड झाल्याने अनेक पक्षी आता निराधार झाली आहेत. 

वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन!

रस्ता विस्तारीकरणासाठी ठेकेदारास परवानगी देताना वन विभागाने वन्यजीवांचा अधिवास असणाऱ्या वृक्षांवर मार्किंग करून अशी वृक्ष तोडण्यास मनाई केली होती. सोबत वन (संवर्धन) अधिनियम १९८० आणि भारतीय वन अधिनियम १९७२ चे उल्लंघन करू नये, असे म्हटले आहे. प्रत्यक्ष वृक्षतोड करताना वरील दोन्ही नियम धाब्यावर बसवून सर्रास पक्ष्यांचा अधिवास असलेली वृक्षही तोडली आहेत. यामुळे अनेक पक्षी निराधार झाले असून, नगर परिषद हद्दीतही वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाल्याने संबंधितावर कारवाई होईल की त्यांना पाठीशी घालण्यात येईल, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com